Raj Thackeray Speech: 'शिवतीर्थ'च्या गॅलरीतून आईनं ऐकलं लेकाचं भाषण..

Raj Thackeray's Mother: त्या आजपर्यंत कधीच प्रत्यक्ष सभेला हजर राहिलेल्या नाहीत .
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

महेश जगताप

MNS Gudhipadwa Melava: गुढी पाडवा मेळाव्यात काल (बुधवारी) राज ठाकरेंनी (Raj Thackeray) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.

राज यांनी शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. या मेळाव्याला राज्यभरातून प्रचंड गर्दी मनसैनिकांनी केली होती. यावेळी राज ठाकरे यांची ही सभा त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या समोरच स्वतः राज ठाकरे राहत असलेल्या शिवतीर्थ बंगल्यातील गॅलरी मधून ऐकली.

Raj Thackeray
Third Front for 2024: तिसऱ्या आघाडीसाठी केजरीवाल करणार सात मुख्यमंत्र्यांची मनधरणी...

कुंदा ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या धाकटी बहीण आहेत. त्या आजपर्यंत कधीच प्रत्यक्ष सभेला हजर राहिलेल्या नाहीत .

शिवसेना (Shivsena) का सोडली याचाही गौप्यस्फोट राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात केला. यावेळी त्यांनी भावनिक होत शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, असं म्हणत प्रथमच शिवसेना का सोडावी लागली आणि कोणामुळे सोडावी लागली हे जाहीररित्या सांगिले आहे. यावेळी राज ठाकरेंनी भाजपबद्दल मात्र मौन बाळगले.

राज ठाकरे यांचं शिवाजी पार्कच्या समोरच घर आहे. घराच्या तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून संपूर्ण मैदान दिसतं. राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांनी गॅलरीत बसून गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेली सभा प्रत्यक्ष ऐकली . ज्यावेळी ठाकरे यांचे भाषण संपलं त्यावेळी घराच्या समोर बरेच मनसैनिक जमा झाले होते . त्यावेळी त्या गर्दीकडे राज ठाकरेंच्या मातोश्री उत्सुकतेने पाहत होत्या .

Raj Thackeray
Assam-Meghalaya Clash : कर्नाटक-महाराष्ट्रानंतर आता 'या' दोन राज्यात सीमावाद पेटला ; एका गावामुळे..

या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच सत्ताधारी पक्षालाही धारेवर धरले व राज्यातील काही प्रश्नांच्या बाबतीत सरकारचे कान टोचले. भोंगे वाजवण्याचे जर वेळेवर नाही रोखले तर पुन्हा आम्ही हा प्रश्न हातात घेऊ त्याचबरोबर हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस सोडवतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

"शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं त्याने मला त्रास झाला," असं सांगतानाच राज ठाकरे म्हणाले, ‘मला बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा नव्हता, माझी कसलीच महत्वकांक्षा नव्हती. पण मला पक्ष सोडण्यासाठी वातावरण तयार करण्यात आले.

’ नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती. त्याचाही किस्सा राज यांनी या मेळाव्यात सांगितला. ते म्हणाले, ‘मी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मी नारायण राणेंशी बोललो, बाळासाहेबांची भेट घडवून आणायचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आणि राणेंची भेट जी घडवून आणायचा मी प्रयत्न केला पण ती भेट ती कोणीतरी घडू दिली नाही’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com