'उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा'

Prakash Mahajan|Uddhav Thackeray|Shivsena : मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Prakash Mahajan, Sanjay Raut & Uddhav Thackeray Latest News
Prakash Mahajan, Sanjay Raut & Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Prakash Mahajan : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीचे आज (ता.२७ जुलै) दोनही भाग प्रसारीत झाले आहेत. यावर भाजप (BJP) नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडूनही जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा, अशी खोचक टीका केली आहे. त्यांनी आज एका खासगा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. (Prakash Mahajan, Sanjay Raut & Uddhav Thackeray Latest News)

Prakash Mahajan, Sanjay Raut & Uddhav Thackeray Latest News
'शिंदे-फडणवीसांच्या शुभेच्छांची आम्हाला गरज नाही!'

प्रकाश महाजन म्हणाले, ठाकरे यांची मुलाखत बघण्याची माझी फारशी इच्छा झाली नाही. मात्र मी थोडक्यात बघितली. मुलाखत बघून मला महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी काळू-बाळू नावाचा एक प्रसिद्ध तमाशा होता. या तमाशाचीच आठवण झाली. इकडून जय महाराष्ट्र म्हटलं की तिकडून जय महाराष्ट्र म्हणायचं. मात्र हे म्हणताना मांजर तरी 'म्याव' जोरात म्हणते असं माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या तोंडून निघत होतं. मात्र, आता ठाकरे का मुलाखत का देत आहेत हे कळत नाही. बापदाद्यांची कमावलेली इस्टेट त्यांनी गमावली अन् आता पडक्या वाड्यात बसून मुलाखत देत आहेत, अशा खोचक शब्दात महाजनांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Prakash Mahajan, Sanjay Raut & Uddhav Thackeray Latest News
ठाकरे झाले कठोर; बंडखोरांच्या शुभेच्छांच्या जाहिरातीही नाकारल्या!

ते पुढे म्हणाले की, ठाकरेंनी अशी मुलाखत देऊन काय होणार आहे. मुलाखत देणारे पत्रकार यांचेच, प्रश्न विचारणाराही यांचा माणुस उत्तर देणारे हेच याला काय अर्थ आहे. हीच मुलाखत दुसऱ्या पत्रकाराला घ्यायला लावली असती तर गोष्ट वेगळी होती. जसे की, माझ्या नेत्याला परवा आडवे-तिडवे प्रश्न विचारले तशी मुलाखत झाली असती तर मग कळालं असतं. आता गेलेली प्रतिष्ठा त्यांची वापस येणार नाही. त्यासाठी आता बाळासाहेब यांचा मुलाखती दरम्यान फोटो काय ठेवला होता. मात्र बाळासाहेबांना त्यावेळी काय वेदना होत असतील हे बघणाऱ्यांनाही कळत होतं. ज्यावेळेस सत्ता होती तेव्हा बाळासाहेब कधी आठवले नाहीत, असा सवालही उपस्थित करत त्यांनी ठाकरेंवर घणाघात केला.

ज्या लोकांनी त्यांच्या पक्षासाठी, त्यांच्यासोबत वीस वर्षे, पंचवीस वर्षे काम केलं ते आज त्यांच्या विचारापासून थोडे दूर काय गेले तर त्यांच्यावर टीका केली जात आहे. चांगलं बोलता येत नसेल तर, वाईट तरी त्यांच्याबद्दल बोलू नका. एवढेही सौजन्य किंवा मोठं मन ठाकरेंना नाही, असा टोलाही महाजनांनी ठाकरेंना लगावला.

Prakash Mahajan, Sanjay Raut & Uddhav Thackeray Latest News
'वर्षा'च्या जागी 'नंदनवना'तच राहणे मुख्यमंत्री शिंदेंनी केले पसंत : बंगल्याला 10 फुट भिंतीचे कुंपण

जे घडलं त्याला कोणाला जबाबदार धरता या प्रश्नावर महाजन म्हणाले की, राजा हा सावधान असावा संशयी नसावा,असे आचार्य चाणाक्यांनी म्हटलं आहे. जसे की शिवाजी महाराज सावधान होते. अष्टावधानी होते ते औरंगजेबासारखे संशयी नव्हते. हीच गफलत उद्धव ठाकरेंची झाली आणि त्यांना आपल्या सहकाऱ्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखता आलं नाही. इतकं सुरू असताना त्यांना कसं कळालं नाही याचा अर्थ ते बेसावध होते किंवा त्यांच्या आजूबाजूंच्या लोकांचेच ते ऐकत होते,असा खोचक टोलाही महाजनांनी ठाकरेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com