Kalyan-Dombivli News : खर्चाची तरतूद झाली नाही का? म्हात्रेंनी डिवचताच पाटलांनी टक्केवारीच काढली

MNS-Shivsena News : दिव्यामध्ये आगरी कोळी वारकरी भवन उभे रहात आहे.
Raju Patil, Dipesh Mhatre News
Raju Patil, Dipesh Mhatre NewsSarkarnama
Published on
Updated on

Raju Patil News : दिव्यामध्ये आगरी कोळी वारकरी भवन उभे रहात आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भवनचे भूमिपूजन होणार आहे. याच वारकरी भवनाच्या मुद्द्यावरून शिंदे गट व मनसेने एकमेकांना डिवचले आहे.

आगरी कोळी वारकरी भवन स्वखर्चातून बांधू असे बॅनर लावले. मात्र, त्यांच्या खर्चाची काही तरतूद झालेली दिसत नाही, असे म्हणत शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना डिवचले. म्हात्रे यांना उत्तर देताना पाटील यांनी टक्केवारी घेऊन पैसे कमविले नाही. स्वखर्चातून आमच्या वडिलांच्या नावे लवकरच वारकरी भवन उभारू, असे म्हणत म्हात्रे यांना टक्केवारीवरून डिवचले.

Raju Patil, Dipesh Mhatre News
Shirur Lok Sabha Constituency : आता 'शिरूर'मधून पैलवान आमदार महेशदादांनीही थोपटले दंड, आढळरावांचे काय होणार?

दिव्यातील बेतवडे येथे आगरी कोळी भवन उभारण्यात येत आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे भूमिपूजन होत आहे. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी खोणी तळोजा येथे 2020 साली वारकरी भवनचे भूमिपूजन केले होते. मात्र, काही राजकीय हस्तक्षेपामुळे पुढे ते वारकरी भवन होऊ शकले नाही. याच मुद्द्यावरून पत्रकार परिषदेत शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी आमदार पाटील यांना डिवचले.

म्हात्रे म्हणाले, यांनी पाटील यांचे नाव न घेता काही लोकांनी स्वखर्चातून आगरी कोळी भवन बांधू अशी घोषणा केली होती. मात्र, त्याचे कुठे काम सुरू असलेले दिसत नाही. खासदार शिंदे हवेत व ट्विटरवर आश्वासने देत नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे प्रत्यक्षात काम करणारे आहेत. काही लोकांनी आगरी कोळी वारकरी भवन स्वखर्चातून बांधू अशा आशयाचे बॅनर लावले होते. त्यांच्या खर्चाची काही तरतूद झालेली दिसत नाही, असा टोला लगावला.

आगरी कोळी भवन या जिव्हाळ्याच्या विषयावर म्हात्रे यांचे डीवचने आमदार पाटील यांच्या जिव्हारी लागले. मात्र, त्यातही त्यांनी म्हात्रे याना सडेतोड उत्तर देत त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. आमदार पाटील म्हणाले, माझ्या बापदादांनी पाकिटमारी करुन किंवा कंत्राटदाराकडून पैसे घेऊन पैसे कमाविले नाही. आम्ही चार भाऊ आहोत. आमच्या वडिलांच्या नावाने वारकरी भवन लवकर उभे करु.

Raju Patil, Dipesh Mhatre News
Pimpri-Chinchwad : मंत्रिमंडळ विस्ताराचा आणखी एक मुहूर्त; पिंपरी-चिंचवडचे खाते उघडणार का?

ज्या वारकरी भवनासंदर्भात बोलले जात आहे. त्याच्यासाठी बिल्डरकडून बदली जागा घेतली होती. त्याच नीच राजकारण स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केले गेले. ज्या बिल्डरकडून बदली जागा घेणार होतो, त्या बिल्डरला धमकाविले गेले. बिल्डरला सांगितले गेले की, तुझा 700 एकरचा प्लॅन पास होऊ देणार नाही. त्या बिल्डराने मला विनंती केली त्या जागेवर भवन उभारू नका. आता आम्ही दुसरी जागा शोधली आहे. त्या जागेवर लवकरच स्वखर्चातून वडिलांच्या नावे वारकरी भवन उभारू असे सांगितले आहे.

लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्टिव्ह झाले आहेत. मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेण्यास पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुरवात केली आहे. म्हात्रे हे सध्या ग्रामीण भागाचा दौरा करत कामांचा आढावा घेत आहेत. यावरून म्हात्रे ग्रामीण भागातून आमदारकीची जागा लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.

Raju Patil, Dipesh Mhatre News
Anurag Thakur News : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांच्या वक्तव्याने कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत

त्यातच ते मनसे आमदार पाटील यांच्यावर टीका करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. पाटील यांचे आपल्या मतदारसंघात वर्चस्व असून कितीही अडवणूक झाली तरी, आम्ही आमच्या जोरावर काम करत आहोत हे दाखवत आहेत. टक्केवारीच्या राजकारणावरून पाटील यांनी म्हात्रे यांना आधी ही डिवचले होते. त्यात आता पुन्हा एकदा पाटील यांनी आपल्या भात्यातून बाण सोडला असून यावर आता म्हात्रे काय उत्तर देतात हे पहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com