Gujarat Election BJP : भाजपची मोठी कारवाई ; अपक्ष म्हणून लढणाऱ्या सात बंडखोरांची हकालपट्टी

Gujarat Election 2022 : भाजपने ४२ विद्यमान आमदारांना या निवडणुकीत तिकीट दिलेले नाही. यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा समावेश आहे.
Gujarat Election 2022
Gujarat Election 2022sarkarnama
Published on
Updated on

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत भाजपने आपल्या बंडखोर नेत्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी ही कारवाई केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत सात उमेदवारांचे तिकीट भाजपने कापले होते, त्यानंतर या उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

मधु श्रीवास्तव, अरविंद लादानी, दीनू पटेल, हर्षद वसावा, धवल सिंह झाला सह सात नेत्यांची हकालपट्टी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात या सात जणांनी पक्षाकडे तिकीट मागितले होते, त्यांचे तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सातही जणांना पक्षाविरोधी कारवाया केल्या प्रकरणी सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.

नांदोद विधानसभेसाठी हर्षद वसावा, केशोद जूनागढ़ येथून अरविंद लदानी , धनगड़रा येथून छत्रसिंह गुंजारिया, पारादी येथून केतन भाई पटेल,राजकोट ग्रामीण येथून भरत भाई चावड़ा, वेरावल येथून उदय शाह, राजुला विधानसभेसाठी करण भाई बरैया हे इच्छुक होते. या सगळ्यांना भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे.

Gujarat Election 2022
Ajit Pawar : कोश्यारींच्या वक्तव्यांवर अजितदादा संतापले ; म्हणाले, 'मोदींनी, राज्यपालांची..'

४२ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं

गुजरातमध्ये सातव्यांदा सत्तेत येण्याचा दावा करणाऱ्या भाजपने ४२ विद्यमान आमदारांना या निवडणुकीत तिकीट दिलेले नाही. यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा समावेश आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात होत आहे. विधानसभेच्या प्रचारसाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. प्रचाराला वेग येणार आहे. काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष या तिन्ही पक्षासाठी सोमवार महत्वाचा दिवस ठरणार आहे. सोमवारी (दि.२१) निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या तीन प्रमुख पक्षांचे नेते गुजरातमध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

मोदी, गांधी, केजरीवाल यांची सोमवारी रॅली

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सोमवारी (दि. २१) निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. अरविंद केजरीवाल रविवारी (दि.२०) गुजरातमध्ये दाखल होतील. केजरीवाल २२ नोव्हेंबरपर्यंत प्रचार करणार आहेत. पी.एम. नरेंद्र मोदी १९ ते २१ नोव्हेंबर पर्यंत गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी २१ नोव्हेंबरला गुजरातमध्ये दाखल होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com