Raju Patil on Shrikant Shinde : राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंवर 'मैत्रीपूर्ण' बाण; आमदार-खासदार आमनेसामने...

MNS Leader Raju Patil on dr shrikant Shinde : मनसे आमदार राजू पाटील यांची खासदार शिंदेंना करून दिली मैत्रीची आठवण, म्हणाले विकास कामांचा निधी मंजूर केला, तरी मैत्री निभावली असं मी समजेल'
Shrikant Shinde Raju patil
Shrikant Shinde Raju patilSarkarnama
Published on
Updated on

MNS Leader Raju Patil : मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैत्रीचा हात देत कल्याण लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला. लवकरच विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजणार आहे.

या निवडणुकीत राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची मैत्री दिसणार का? यावर बोलताना पाटील म्हणाले की,"आम्ही आमच्या हिशोबात लढू. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, येथील खासदार व माझे मित्र म्हणून माझी त्यांना एवढीच विनंती असेल, की माझ्या मतदारसंघातील विकास कामांसाठीचा निधी त्यांनी त्वरित मंजूर करावा. एवढे केले तरी मैत्री निभावली असं मी समजेल." असे म्हणत राजू पाटलांनी शिंदेंना मैत्रीची जाणीव का करून दिली? आता यावरच वेगळीच चर्चा होऊ लागली आहे.

आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी निर्भय जर्नालिस्ट फाउंडेशनच्यावतीने वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राजू पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. डॉ. श्रीकांत शिंदे यांना मनसेच्या मदतीनेच विजय मिळविता आला आहे हे सर्वांना माहित आहे. तुम्ही डॉ. शिंदे यांना मैत्रीचा हात देऊ केला होता. मनसेच्या मदतीच्या जोरावरच शिवसेनेला येथे विजय मिळविता आला आहे हे सगळ्यांना माहीत आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत या मैत्रीची पुनरावृत्ती होणार का ? भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिंदे गटातून अनेक जण येथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी आमदार पाटील यांना केला. यावर पाटील म्हणाले. 'आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. मनसेने मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता. आम्ही राज (Raj Thackeray) साहेबांचा आदेश होता त्यानुसार केलं. आता त्यांच राजकारण कसे चालत हे त्यांना माहीत. आम्ही आमच्या हिशोबातच लढणार आहोत.'

Shrikant Shinde Raju patil
Sameer Wankhede Joins BJP: समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार? 'या' मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

'आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) मला मदत करतील किंवा करणार नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांची पक्षीय धोरणे वेगळी होती. त्यांच्याही काही अडचणी असू शकतील. तो त्यांचा कॉल आहे. मात्र, माझी एकच इच्छा आणि अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि इथले खासदार म्हणून तसेच माझे मित्र म्हणून विकास कामांसाठी मी जो निधी मागितला आहे. तो मला त्वरित दिला तर बरे होईल, कारण ही कामे त्यांच्याच मतदारसंघातील आहेत. त्यांनी एवढं केलं तरी मैत्री निभावली', असे मी समजेल असे आमदार राजू पाटील म्हणाले.

Shrikant Shinde Raju patil
Sameer Wankhede Joins BJP: समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार? 'या' मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून आमदार राजू पाटील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच शिवसेना (ShivsenaUBT) ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून रमाकांत मढवी, राजेश मोरे, भाजपकडून संदीप माळी या इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महायुती येथे काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com