पक्ष सोडणाऱ्यांना बघून घेऊ! आमदार राजू पाटलांचा नेत्यांना जाहीर दम

कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे.
MNS MLA Raju Patil with Raj Thackeray
MNS MLA Raju Patil with Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

कल्याण : राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) गळती लागल्याचे चित्र आहे. असे असताना आता मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मोठा धक्का दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. याचवेळी पक्ष सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ, असा थेट दम आमदार पाटील यांनी नेत्यांना दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती लागली आहे. याचवेळी मनसेत इनकमिंग सुरू झाले आहे. डोंबिवलीत मनसेने मेळावा आयोजित करून शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्यात काही जणांनी मनसेत प्रवेश केला. या मेळाव्याला मनसेचे पदाधिकारी प्रकाश भोईर, मनोज घरत, हर्षद पाटील, मंदा पाटील, राहुल कामत आदी उपस्थित होते. मनसेत दाखल होण्यास अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. परंतु, पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, कोरोना काळात कार्यक्रम घेतला नव्हता. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी दोन वर्षे थांबावे लागले, असे आमदार पाटील या स्पष्ट केले.

MNS MLA Raju Patil with Raj Thackeray
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या अन् भाजप नेत्याचं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडं बोट

या वेळी बोलताना आमदार राजू पाटील यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना दम दिला आहे. मनसेतून हा सोडून चालला, तो सोडून चालला, अशा अपवा पसरवल्या जात आहेत. भ्रमात राहू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. ही तर केवळ झाँकी असून, निवडणूक अजून बाकी असल्याचे सांगत पाटील यांनी विरोधकांनाही सूचक इशारा दिला आहे.

MNS MLA Raju Patil with Raj Thackeray
दुबईहून परतलेल्या मंत्र्याचा 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

राजेश कदम हे मनसे सोडून गेले असून, त्यांचा उल्लेखह न करता आमदार पाटील म्हणाले की, एक भोंगा वाजतो, असे कितीही भोंगे वाजले तरी आम्हाला फरक पडत नाही. हा भोंगा पाकिट घेऊन दुसऱ्या पक्षात गेला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत 2009 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले. नंतर 2014 मध्ये मोदी लाटेचा फटका बसल्याने 9 नगरसेवक निवडून आले. आता पुन्हा मोठ्या संख्येने मनसेचे नगरसेवक निवडून येतील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com