Dombivali News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे हेच कल्याण लोकसभा निवडणूक लढणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच म्हटले आहे. अनेक दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजप सांगेल तोच उमेदवार अशी घोषणा करत श्रीकांत शिंदेंना मदत करणार नाही असा पवित्रा भाजप नेत्यांनी घेतला होता. या वादावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या विधानाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 15 दिवसांपूर्वीच शिंदे भाजपा एकाच थाळीचे चट्टे पट्टे आहेत. कल्याण लोकसभेत शिवसेनेचाच खासदार असणार असे सांगितले आहे. त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. कल्याण लोकसभेच्या जागेबाबत आमदार राजू पाटील यांनी केलेले विधान खरे ठरले, अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाकडे राहील, असे स्पष्टपणे सांगितले. फडणवीस यांनी हे स्पष्टपणे बोलताच कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय वाद आता क्षमला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
मात्र 15 दिवसांपूर्वीच कल्याण ग्रामीणचे आमदार पाटील यांनी कल्याण लोकसभेची जागा शिवसेना लढवणार व भाजप त्यांना मदत करणार असे बोलले होते. राजू पाटील यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल केला जात आहे.
डोंबिवलीतील भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला. यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची भूमिका घेत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला.
यामध्ये आघाडीवर राहिले ते सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा फडणवीस यांचे निकटवर्ती रविंद्र चव्हाण. पोलीस अधिकारी बागडे यांची बदली न होता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आणि ठाणे जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी शिंदे गटास असहकार्य ची भूमिका घेतली. भाजपच्या या ठरावानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाचा राजीनामा देण्याची भूमिका मांडली होती.
यावर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी भाजप शिवसेनेवर टिका केली होती. त्यानंतर राजू पाटील यांनी देखील मित्र पक्षात सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं होते.
"हे एकाच थाळीचे चट्टेपट्टे आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यावरून राजकारण करण्याचे काहीच कारण नाही. गृहखाते यांच्याकडे आहे. तडकाफडकी बदली करायची असेल हे करू शकतात. कुठेतरी लक्ष लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळत आहे," पाटील म्हणाले होते.
"सध्या जे सर्व्हे आलेले आहेत. आरएसएस किंवा इतर काही लोकांचे त्यात विशेषतः शिंदे गटाला खूप कमी स्थान दिलेले आहे. सामान्यांचे त्याच्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली ही खेळी आहे का ? असा संशय येतो. यांची सवयच आहे 2014 ला ही लोक रस्त्यावर भांडतात तसे भांडत होते. नंतर यांनी युती केली लोकांचा कुठेतरी लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी चाललेले यांचे प्रयत्न आहे, असे आमदार पाटील म्हणाले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.