Maharashtra Politics : CM शिंदेंनंतर आमदाराचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'तीन महिन्यांपूर्वीच ठाकरेंना भाजपसोबत...'

BJP Vs Shivsena UBT : एकनाथ शिंदे जे बोलले ते खरं आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा कालही होती आणि आजही आहे.
uddhav thackeray devendra fadnavis
uddhav thackeray devendra fadnavissarkarnama

Mumbai News : दोन राजकीय पक्षांतील मोठ्या भूकंपाचे धक्के बसले. यात पहिला धक्का एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला, तर दुसरा धक्का अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. यानंतर या दोन्ही नेत्यांना पक्ष आणि चिन्हही मिळालं. पण या राजकीय पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटातून विस्तवही जात नाही. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना खळबळजनक दावेही केले जातात.अशातच आता भाजपच्या नेत्याने माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी सोमवारी (ता.22) मीडियाशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरेंविषयीही मोठं विधान केलं. ते म्हणाले, एकनाथ शिंदे जे बोलले ते खरं आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा कालही होती आणि आजही आहे. हिंदुत्व विकण्याचं काम करायचं, मग ऑफर द्यायची हे सध्या त्यांचं काम सहन होण्यापलीकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंचा शब्द पडू दिला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

तसेच या वेळी खळबळजनक दावा करताना ते म्हणाले, तीन महिन्यांपूर्वीही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपसोबत येण्याचा प्रयत्न केला. पण आता आमची दारं कायमची बंद झाली आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले.

uddhav thackeray devendra fadnavis
Uddhav Thackeray News : "अमरावतीत थापाड्यांची अन् खोटारड्यांची लंका जाळायला आलोय," ठाकरे राणांवर कडाडले

लाड म्हणाले, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर अडीच महिने आदित्य ठाकरे गायब होते. पण आता पराभव दिसतोय त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. ज्या आदित्य ठाकरेंना शिंदे यांनी अंगा-खांद्यावर खेळवलं. सरकार, सत्ता, पक्ष, व्यवस्था दाखवली. अशा व्यक्तीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना त्यांची जीभ थरथरली कशी नाही? कापली कशी नाही?, असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारला आहे.

ठाकरे- पवारांवर आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकरांना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांना अटक करण्याचे षडयंत्र रचल होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

यावर भाष्य करताना लाड म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संजय पांडेंना नियुक्त केलं. त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांच्यासह मलाही अटक करण्याचा त्यांचा डाव होता. माझ्याविरोधात खोट्या केसेस टाकून मला त्रास देण्याचा कट होता. आम्हाला याचा त्रास झाला ,पण आम्ही लढत राहिल्याचंही लाड यांनी या वेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे नेमकं काय म्हणाले..?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काही खळबळजनक खुलासे केले आहेत. यात ते म्हणाले, सुरतला निघाल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पण ही ऑफर नाकारल्यानंतर त्यांनी दिल्लीत भाजप नेत्यांना फोन केला. आपण सरकार स्थापन करू, शिंदे यांच्याबरोबर का जाताय? असंही उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र, या वेळी दिल्लीतून आता उशीर झाला असल्याचे ठाकरे यांना कळवण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे या मुलाखतीत म्हणाले.

R

uddhav thackeray devendra fadnavis
Nashik Loksabha : 'वंचित'चे नाशिकमध्ये 'मराठा कार्ड', करण गायकर यांना उमेदवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com