
Mumbai News: मराठी अस्मिता जपण्यासाठी मनसेकडून आज मीरा भाईंदर येथे आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते. रस्स्यावर उतरुन त्यांनी मोर्चाला सुरवात केली. या मोर्चात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक एन्ट्री केल्याने मोर्चात गोंधळ निर्माण झाला.
प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी होतात, त्यांच्याविरोधात मनसैनिकांनी घोषणा देत त्यांना मोर्चातून हुसकावून लावलं. 'जय गुजरात'अशा घोषणा देत त्यांच्याविषयी संताप व्यक्त केला. '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा देत मोर्चकरांनी प्रताप सरनाईक यांनी मोर्चातून बाहेर काढले. आंदोलकांचा रोष पाहता प्रताप सरनाईक यांनी मोर्चातून काढता पाय काढला.
मराठी एकीकरणाचा समितीचा हा मोर्चा होता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेने यावर राजकारण केले, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
मीरा भाईंदरमध्ये मनसे, ठाकरे सेनासह मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा सुरु आहे. या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे, मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांकडून प्रताप सरनाईक यांना विरोध करण्यात आला. सरनाईक मोर्चात सहभागी झाल्याने काही काळासाठी वातावरण तापले होते. सरनाईक यांच्यासमोर यांच्यासमोर ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनकर्त्यांनी 'सरनाईक गो बॅक' अशा घोषणाही दिल्या. जय गुजरात म्हणत आंदोलनकर्त्यांनी सरनाईकांना डिवचले. आंदोलनकर्त्यांचा रोष पाहून सरनाईक यांना अंदोलनस्थळाहून माघारी परतावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.