थेट राज ठाकरेंनाच आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?

ब्रिजभूषण हे भाजपचे खासदार असून पक्षातील ते मोठे वजनदार नेते आहेत. त्याचं नाव बाबरी मशिदीचा ढाचा पाडणाऱ्या आरोपींमध्ये होतं.
Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singh
Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singhsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : (Raj Thackeray ayodhya Visit) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते पूर्ण एक दिवस अयोध्येत असणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरून भाजप आणि मनसेत वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या उत्तरप्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh)यांनी विरोध दर्शविला आहे. यूपीतल्या जनतेची माफी मागितल्या शिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.त्यांनी गुरुवारी सलग ट्विट केले.

Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singh
गुंड आप्पा लोंढे खूनप्रकरणी सहा जणांना दुहेरी जन्मठेप

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय 'उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेवर येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी' राज ठाकरे यांना आव्हान देणारे ब्रिजभूषण शरण सिंह कोण आहेत जाणून घेऊया

ब्रिजभूषण हे भाजपचे खासदार असून पक्षातील ते मोठे वजनदार नेते आहेत. त्याचं नाव बाबरी मशिदीचा ढाचा पाडणाऱ्या आरोपींमध्ये होतं. जेलमध्ये असताना त्यांना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पत्र पाठवलं होतं.८ जानेवारी १९५६ जन्मलेले ब्रिजभूषण यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. ते महाविद्यालयीन जीवनापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत.

Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singh
प्रशांत किशोर यांच्या दहा मोठ्या घोषणा ; अशी आहे रणनीती

कोण आहेत ब्रिजभूषण शरण सिंह?

  1. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा गोंडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली जिंकली होती.

  2. गोंडा लोकसभा मतदारसंघातून १२व्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा समाजवादी पक्षाचे नेते कीर्ती वर्धन सिंह यांनी पराभूत केलं होतं.

  3. पुन्हा १९९९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रतिस्पर्धी उमेदवार कीर्ती वर्धन सिंह यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला.

  4. सध्या ते कैसरगंज मतदारसंघातून खासदार आहेत. ते या मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

  5. २००८ मध्ये ते भाजपतून समाजवादी पक्षात गेले होते. त्यांनंतर त्यांनी २००९ मध्ये बसपाच्या सुरेंद्र नाथ अवस्थी यांचा ७२,१९९ मतांनी पराभूत केलं होतं.

  6. १६व्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ मध्येही ते विजयी झाले आहेत.

  7. ब्रिजभूषण शरण सिंह हे अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्षही आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com