गुंड आप्पा लोंढे खूनप्रकरणी सहा जणांना दुहेरी जन्मठेप

२८ मे २०१५ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरानी रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून आप्पा लोंढे याची हत्या केली होती. ही घटना लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना घडली.
Gangster Appa Londhe case news in Marathi, Pune Crime News, Pune latest Marathi news
Gangster Appa Londhe case news in Marathi, Pune Crime News, Pune latest Marathi newssarkarnama
Published on
Updated on

पुणे : कुप्रसिध्द गुंड आप्पा तथा प्रकाश हरीभाऊ लोंढे (४८) खून (Appa Londhe) प्रकरणात सहा जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर नऊ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सात वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. (Gangster Appa Londhe case news in Marathi)

आप्पा तथा प्रकाश हरीभाऊ लोंढे (४८) याचा २८ मे २०१५ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरानी रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून हत्या केली. ही घटना लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना घडली.

या प्रकरणात मोक्कानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, विष्णू यशवंत जाधव,नागेश लक्ष्मण झाडकर अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींनी नावे आहेत.

Gangster Appa Londhe case news in Marathi, Pune Crime News, Pune latest Marathi news
ऐन पावसाळ्यात बँकांचे राजकारण चांगलेच रंगणार!

अप्पा लोंढे याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरानी धारधार हत्याऱ्यांच्या साह्याने अनेक वार केले. अप्पा लोंढेवर खून, खूनाचे प्रयत्न, जमीन लुबाडणूक या सारखे तब्बल पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. लोंढे याचा भविष्यात जामिनास, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Gangster Appa Londhe case news in Marathi, Pune Crime News, Pune latest Marathi news
बाळासाहेबांसारखीच व्यंगचित्रकलेची ज्यांच्यामध्ये क्षमता होती, त्यांनी भोंग्याचं राजकारण सुरु केलयं!

खून होण्यापूर्वी दहा वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अप्पा लोंढे याच्या घरापासून काही अंतरावर चालत जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करुन हल्लेखोर फरार झाले होते. अप्पा लोंढे याची बारामती, हवेली, दौंडसह पुणे जिल्ह्यात दहशत होती. त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com