Raj Thackeray News : खड्ड्यातून जातात तरीही, तुम्ही त्याच लोकांना मतदान का करतात ? राज ठाकरेंचा सवाल ; लोकप्रतिनिधींना धडा शिकवा..

Raj Thackeray Live Panvel : खड्डयाच्या विरोधात मनसेचे आंदोलन
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Panvel : खड्ड्यातून जातात तरीही तुम्ही त्याच लोकांना मतदान का करतात, लोकप्रतिनिधींना धडा शिकवावा, असे वाटत नाही का ? त्याच त्याच लोकांना तुम्ही मतदान का करतात ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला केला. पनवेलमध्ये मनसेने खड्डयाच्या विरोधात आंदोलन केले. त्यावेळी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

दरडी कोसळतात, त्यात माणसांचा मृत्यू होत आहे, या घटनांकडे सरकारचे दुर्लक्ष करीत आहे. अनेक 'सरकार' गेलीत तरीही रस्ते तसेच आहेत. समृद्धी महामार्ग चार वर्षात होतो, मग अन्य रस्ते बांधायला पंधरा वर्ष का लागतात, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray News
Raj Thackeray News : खड्ड्यातून जातात तरीही, तुम्ही त्याच लोकांना मतदान का करतात ? राज ठाकरेंचा सवाल ; लोकप्रतिनिधींना धडा शिकवा..

चांद्रयान चंद्राऐवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते. चंद्रावरचे खड्डे त्यांना महाराष्ट्रात पाहायला मिळाले असते, असे राज म्हणाले. या मेळाव्यातून मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावे, यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आंदोलन करावे, अशा सूचनाही राज ठाकरेंनी केल्या.

राज यांनी पनवेलमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थित राहून रस्ते, त्यावरचे खड्डे आणि त्याकरिताचे आंदोलन यावर त्यांनी भूमिका मांडली. राज यांच्या भाषणात पहिलाच मुद्दा रस्त्यांचा राहिला. त्यावरून राजकीय फोडाफोडीला हात घातला. त्यात, अजितदादादांना ओढले आणि थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार-अजित पवारांच्या भेटीचा मुद्दा उकरून काढला.

गाडी लपवल्याचा आणि त्यावरचा अजितदादांचा खुलासाही राज यांनी आपल्या स्टाईलमध्ये बोलून दाखविला. तेव्हा पुन्हा एकदा राज यांनी अजितदादांची मिमिक्री केली.सत्तेत सहभागी होण्याबाबतचे अजितदादांनी मांडलेले कारण पुढे करून राज यांनी त्यांची खिल्ली उडवली.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com