बाबरी पाडली तेव्हा राज कुठे होते ? असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीच्या छंदावरुन टीका करण्यात आली आहे.
बाबरी पाडली तेव्हा राज कुठे होते ? असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेचा हल्लाबोल
mla Raju Patil tweet,
Published on
Updated on

पुणे : बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं (Raj Thackeray) काय सुरु होतं? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच शिवसेनेच्या बैठकीत उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी उत्तर दिलं आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टि्वटवर एक चित्र शेअर केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख न करता राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. या चित्रात उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीच्या छंदावरुन टीका करण्यात आली आहे.

'1995 ला युतीच्या माध्यमातून सेना सत्तेत येईपर्यंत आपण कुठे होतात हे अखंड महाराष्ट्राला माहित आहे', असे पाटील यांनी म्हटले आहे. या चित्रावरुन सध्या समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांमध्ये जुंपली आहे.

राज ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे. त्याच मुद्द्यावरुन त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.तर दुसरीकडे भाजपकडून पोलखोल यात्रेतून शिवसेनेवर सडकून निशाणा साधला जात आहे. त्याला शिवसेनेने देखील आता तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे.

बाबरी पाडली तेव्हा राज कुठे होते ? असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेचा हल्लाबोल
Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेसाठी दोन हजार वकीलांचा फौजफाटा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना खासदारांसाठी 'वर्षा' निवासस्थानी नुकताच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या स्नेहभोजनाआधी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या प्रमुख प्रवक्त्यांची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. यावेळी त्यांनी आगामी काळात काय रणनीती असेल याबाबतचा कानमंत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

"आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रवक्तांवर तुटून पडा. सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा. आपली कामं लोकापर्यंत पोहचवा," अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.

बाबरी पाडली तेव्हा राज कुठे होते ? असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेचा हल्लाबोल
‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से ;अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

राज ठाकरे हे आज औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेसाठी रवाना झाले आहेत आहेत. पुण्यात त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com