MNS protest Kalyan : शिंदेंच्या आमदाराची स्टाईल गाजतेय मुंबईत; मनसे कार्यकर्त्यांनी 'टाॅवेल-बनियन'वर तापवला 'हा' मुद्दा!

MNS Protest in Kalyan Over Dirty Water Supply Led by Yogesh Gavhane : गढूळ पाणी पुरवठ्यावरून मनसे कार्यकर्ते कल्याण महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात चांगलेच आक्रमक झाले आहे.
MNS protest Kalyan
MNS protest Kalyan Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli water issue : भाजप महायुती सरकारच्या पावसाळी अधिवेशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'टाॅवेल-बनियन'वर आमदार निवासातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला केलेल्या मारामारीमुळे चांगलेच गाजले. खराब अन्नपदार्थ खाऊ घातल्याने आमदार गायकवाड यांनी थेट कँटीनमधील कर्मचाऱ्याला मुक्केबाजी केली.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला, तरी आमदार गायकवाड यांची ही स्टाईल उपरोधिकपणे मनसे कार्यकर्त्यांनी वापरत प्रशासनाला डिवचलं आहे. 'प्रशासनाला हीच भाषा समजत असेल, तर सत्ताधाऱ्यांच्या याचपद्धतीने टाॅवेल-बनियनवर यावे लागत आहे', असा टोला मनसेने लगावला.

कल्याणमधील मनसेचे (MNS) उपशहरप्रमुख योगेश गव्हाणे यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. 'गेले अनेक महिन्यांपासून कल्याण पूर्वमध्ये गढूळ पाणी पुरवठा होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहे. पण प्रशासन दुर्लक्ष करत, कल्याणकरांच्या जीवाशी खेळत आहे', असा आरोप गव्हाणे यांनी केला.

नुकताच मंत्रालयातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाले म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली. तिथं ते 'टाॅवेल-बनियन'वर होते. आम्ही फक्त त्यांच्या स्टाईलने आमची मागणी मांडण्यासाठी 'टाॅवेल-बनियन'वर आलो आहोत".

MNS protest Kalyan
Asaduddin Owaisi on Thackeray brothers : 'ठाकरे बंधू एकत्र येणार, मी काय बोलू?'; असदुद्दीन ओवैसी यांचा मराठीच्या संघर्षावर सल्ला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com