विरार : पालघर (Palghar) जिल्हा परिषद निवडणुकीत (ZP Election Result 2021) साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते ते खासदारपुत्राच्या मतदार संघाकडे. या ठिकाणी राज्यातील सेनेच्या मंत्र्यानी आणि खासदारांनी ठिय्या देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जातीने लक्ष घातलेल्या या निवडणुकीत अखेर खासदार पुत्राचा पराभव झाल्याने हा शिवसेनेला (Shivsena) धक्का असल्याचे मानले जात आहे. तर त्या विरोधात भाजपने (BJP) ही निवडणूक प्रतिष्ठेची करून स्थानिक विरोधात उपरा असा प्रचाराला रंग देऊन ही निवडणूक जिंकली आहे.
निवडणुकीपूर्वी खासदार पुत्र जिंकणार असे दवे केले जात असताना निवडणूक निकालात खासदार पुत्र थेट ३ नंबरला गेल्याचे चित्र येथे दिसत होते. गावित यांच्या मुलाच्या पराभवाने शिवसेनेत आता दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी शिवसैनिकांना डावलून अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने सेनेला पराभवाचा सामना करावा लागला होता.
पालघर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेनेने ओबीसी जागेवर खासदार पुत्र रोहित या आदिवासी तरुणाला संधी दिल्याने हाच शिवसेनेला धक्का बसण्याचा टर्निग पॉइंट होता. मीरा रोड येथून येऊन पालघरचे आमदार, खासदार झालेल्या राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit) यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला उतरवल्याने डहाणू तालुक्यातील वणई गट नकाशावर आला आहे. या गटात सहा रंगी लढत होऊन त्यात खासदार पुत्राचा प्रभाव झाला आहे. खासदार राजेंद्र गावित आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती.
ओबोसी आरक्षण रद्द झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. साऱ्याच पक्षांनी ओबीसी उमेदवार दिले असताना शिवसेनेने मात्र जिल्हापरिषद सदस्यांला घरी बसवून त्या ठिकाणी राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला उमेदवारी दिल्याने हा मतदार संघ सद्या चर्चेत आला होता. या निवडणुकीत शिवसेनेने आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्या बाहेरील शिवसैनिकही प्रचारात उतरविण्यात आले होते. तर भाजपने या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध उपरा असा प्रचाराचा रोख ठेऊन ही जागा आपल्या पदरात पाडल्याने यापुढे शिवसेना नेतृत्वाला निवडणुकीत स्थानिकांना डावलल्यास काय होऊ शकते याचा अंदाज आला असावा. असे चित्र दिसत आहे.
यापूर्वी पालघर नगरपरिषद निवडणुकीत ही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादीतून आलेल्यांना थेट नगराध्यक्षांचे तिकीट दिले होते. त्यात त्या जागेवर शिवसेनेचास पराभव झाला होता. तर विधान सभेला स्थानिक शिवसैनिकांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या विजय पाटील यांना वसई आणि बाहेरून आयात केलेल्या शर्मा यांना नालासोपारा येथून तिकीट दिल्यावर तसेच बोईसरमध्ये बविआमधून आलेल्या विलास तरे यांना उमेदवारी दिल्याने तिथे शिवसेनेचा प्रभाव झाला होता. त्यामुळे यापुढे तरी शिवसैनिकांना न्याय मिळेल का? असा प्रश्न खासदार पुत्राच्या पराभवानंतर शिवसेनेत विचारला आज आहे.
पंकज दिनेश कोरे (भाजप)3654
वर्षा धनंजय वायडा (काँग्रेस)3242
वर्षा धनंजय वायडा (काँग्रेस)3242
मताधिक्य - 412
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.