Atal Setu News : अटल सेतूच्या उद्घाटन मंचाला राजकीय लागण?

Mumbai Trans Harbour Link Inauguration Politics : मंचावरील सात मान्यवरांमध्ये बावनकुळे, स्थानिक आमदार, खासदारांचा निमंत्रणाअभावी कार्यक्रमावर बहिष्कार
Atal Setu inauguration
Atal Setu inaugurationSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी-न्हावाशेवा या अटलसेतूचं (Mumbai Trans Harbour Link Inauguration) आज उद्घाटन झालं आणि या कार्यक्रमाला राजकीय रंग दिल्याची चर्चाही सुरू झाली. विशेष म्हणजे हे उद्घाटन करताना व्यासपीठावर पंतप्रधानांसह केवळ सातजण होते. त्यात भाजपच्या बड्या नेत्याचा सहभाग सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन गेला.

देशातील सर्वात मोठ्या समुद्रपुलाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईत होते. अटल सेतूचं उद्घाटन त्यांनी केलं, त्यावेळी सोबत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), कोरियन कंपनीचे अधिकारी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उपस्थित होते.

Atal Setu inauguration
Shiv Sena : मोदींच्या कार्यक्रमात ठाकरे गटाला डावललं? स्थानिक आमदार-खासदारांचा बहिष्कार

चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर दिसल्यामुळे सरकारी कार्यक्रमात राजकारण घुसवल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अगदी निवडक मंडळींमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थान कसं मिळालं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ते कोणत्याही खात्याचे मंत्री नाहीत. ते भाजपचे आमदार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असताना त्यांना अटल सेतूच्या उद्घाटनाच्या मंचावर संधी कशी मिळाली, याकडे लक्ष वेधलं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गंभीर बाब म्हणजे अटल सेतूच्या उद्घाटनाचं निमंत्रण स्थानिक आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांना आमंत्रण नसल्याने त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आज सकाळी अरविंद सावंत यांना आमंत्रण देण्यात आले. त्यावेळी 'तुमचा पत्ता उशिराने सापडल्याने आमंत्रण उशिरा देत आहोत,' असे कारण देण्यात आले.

अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे अनेक वर्षे खासदार आहेत. तरीही त्यांना पत्ता सरकारला सापडत नसेल, तर याला राजकारण नाही तर काय म्हणावे, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे खासदार आणि आमदारांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे आमदार अजय चौधरी आणि खासदार अरविंद सावंत हे दोघेही ठाकरे गटाचे आहेत.

Atal Setu inauguration
PM Narendra Modi in Nashik : आता मला अडचण राहिली नाही : खासदार गोडसे असं का म्हणाले?

नवी मुंबईतही पंतप्रधान मोदी यांची सभास्थळावरून गाडीतून रॅली निघाली तेव्हाही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार, तसेच मोदींच्या मागे बावनकुळे उभे होते.

एकीकडे स्थानिक आमदार, खासदारांना डावललं जातं आणि दुसरीकडे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंना अटल सेतूच्या मंचावर निवडक सात मान्यवरांमध्ये संधी मिळते, यावरून राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे.

R...

Atal Setu inauguration
PM Narendra Modi : मोदींनी जिंकली नाशिककरांची मने...! डॉ. भारती पवारांनी सांगितले कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com