सत्तेचा गैरवापर करुन 'जरंडेश्वर'च्या अवसायनाची काढलेली नोटीस खोडसाळपणाची!

प्रसिद्ध केलेली नोटीस खोडसाळपणाने व कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने प्रसिद्ध केल्याचे दिसून येत आहे.
shalinitai patil
shalinitai patilsarkarnama

कोरेगाव : ''जरंडेश्वर (jarandeshwar) सहकारी साखर कारखाना (sugar factory)सध्या हा ईडीच्या ताब्यात असताना कारखाना अवसायनात निघाल्याची  प्रसिद्ध झालेली नोटीस बेकायदेशीर, खोडसाळपणाची व सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करणारी आहे. सत्तेचा व शासकीय अधिकाऱ्याचा गैरवापर करून हे सर्व प्रकार सुरू आहेत. ते कोणीही गांभीर्याने घेऊ नयेत, असे आवाहन ‘जरंडेश्वर’च्या संस्थापिका, अध्यक्षा डॉ. शालिनीताई पाटील (shalinitai patil)यांनी पत्रकाद्वारे सभासद शेतकऱ्यांना केले आहे.

चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला असून, त्यावर अवसायक म्हणून कोरेगावच्या सहायक निबंधकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कारखान्याच्या वतीने मुंबई येथील डीआरएटी कोर्टात कारखान्याचा विक्री व्यवहार रद्द करण्यासंदर्भातील दावा सुरू असताना व ही न्यायप्रविष्ट बाब असताना तसेच सध्या हा कारखाना ईडीच्या ताब्यात असताना कारखाना अवसायनात निघाल्याची  प्रसिद्ध झालेली नोटीस बेकायदेशीर, खोडसाळपणाची व सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करणारी आहे.

नजीकच्या काळात योग्य तो निर्णय होऊन हा कारखाना सभासदांना मिळणार असल्याची कल्पना संबंधितांना असल्यामुळे सत्तेचा व शासकीय अधिकाऱ्याचा गैरवापर करून हे सर्व प्रकार सुरू आहेत. ते कोणीही गांभीर्याने घेऊ नयेत, असे आवाहन ‘जरंडेश्वर’च्या संस्थापिका, अध्यक्षा डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्रकाद्वारे सभासद शेतकऱ्यांना केले आहे.

श्रीमती पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, की जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यास दहा जून २०२० रोजी पुणे येथील प्रादेशिक साखर सहसंचालकांनी नोटीस दिली होती. त्यास उत्तर देऊन कारखान्याच्या वतीने सुरू असलेल्या कामकाजाची सर्व माहिती पत्रामध्ये नमूद केली होती व कारवाई रद्द करावी, असे कळवले होते. त्यावर प्रादेशिक सहसंचालकांनी ‘कोर्टात दाद मागावी,’असे कारखान्यास लेखी कळवले आहे.

shalinitai patil
मॅाडीफाय दुचाकीवरुन हवा करणाऱ्या युवकांची पोलिसांनी काढली 'हवा'

कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दावा (क्रमांक ९२४५०/२०२०) दाखल केला असून, प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशाला स्थगिती मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यावर चार फेब्रुवारी २०२२ रोजी युक्तिवाद झाला असून, पुढील युक्तिवाद चार मार्च २०२२ रोजी ठेवला आहे.

अशाप्रकारे कायदेशीर कारवाई सुरू असून, याप्रकरणी अंतिम निर्णय येणे असताना व ही न्यायप्रविष्ट बाब असताना काल (ता. १८) कोरेगाव येथील सहायक निबंधकांनी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली नोटीस खोडसाळपणाने व कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने प्रसिद्ध केल्याचे दिसून येत आहे.

कारखान्याचा फार्मल पझेशन ईडीने दोन जुलै २०२१ रोजी घेतला आहे. सध्या कारखाना ईडीच्या ताब्यात आहे व कारखान्याबाबत कोणताही निर्णय घेताना ईडीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. असे असताना तसेच कारखान्याच्या वतीने मुंबई येथील डीआरएटी कोर्टात दावा सुरू आहे. त्यात कारखान्याचा विक्री व्यवहार रद्द होऊन कारखाना पुन्हा सभासदांना मिळावा, ही मागणी केली आहे. सिक्युरिटायझेन कायदा शेतकऱ्यांच्या संस्थेस लावता येत नाही व त्या कायद्यानुसार बँकेने कारखान्याची केलेली विक्री रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

तेरणा सहकारी साखर कारखान्याची निविदा प्रक्रिया नुकतीच डीआरएटी कोर्टाने रद्द केली आहे. त्या धर्तीवर आपल्या कारखान्यास न्याय मिळणार आहे. डिस्टिलरी प्रकल्पही नजीकच्या काळात सभासदांना मिळणार आहे, तसेच कारखान्याबाबतही योग्य तो निर्णय नजीकच्या काळात लागणार आहे, याची कल्पना संबंधितांना असल्यामुळे सत्तेचा व शासकीय अधिकाऱ्यांचा गैरवापर करून हे सर्व प्रकार सुरू आहेत. हे कोणीही गांभीर्याने घेऊ नयेत, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com