Silver Oak Attack:बारामतीत गोविंदबागेसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त

''आमच्या नेत्यांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर घरात घुसून मारु''
Silver Oak Attack:बारामतीत गोविंदबागेसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त
sarkarnama

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी काल एस.टी. कर्मचा-यांनी हल्ला केला, त्याचा निषेध करण्यासाठी आज बारामती शहर व तालुका राष्ट्रवादीच्या वतीने निषेध सभा झाली. बारामती शहर पोलिस ठाण्याच्या बाहेरील बाजूस झालेल्या या सभेत युवक कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

कालच्या घटनेनंतर आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त होते. इतक्या दिवस नेत्यांच्या सूचनेनुसार आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला आता मात्र बारामतीत येऊन जर कोणी येथील शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर घरात घुसून मारु, सरळ पायावर याल जाताना पायावर जाण्याची स्थिती राहणार नाही, या पुढील काळात राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देईल, अशी आक्रमक भाषा बहुसंख्य वक्त्यांनी भाषणात वापरली.

Silver Oak Attack:बारामतीत गोविंदबागेसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजपच ; राऊतांचा गंभीर आरोप

''गेली अनेक वर्षे संयम बाळगला, आता मात्र आमच्या नेत्यांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर घरात घुसून मारु, बारामतीत येऊन आंदोलन करुन नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर दोन पायांवर पुन्हा परत जाऊ देणार नाही..''अशा शब्दात आज बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

12 एप्रिल रोजी बारामतीत गोविंदबाग येथे आंदोलनाचा इशारा दिलेला असल्याने त्या दिवशी बारामती शहर व तालुक्यातील राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता गोविंदबाग येथे येऊन थांबेल व आंदोलकांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिला.

Silver Oak Attack:बारामतीत गोविंदबागेसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त
'भोंगे बंद करा,' म्हणण्याचे कारण काय ; राज ठाकरेंना अजितदादांचा सवाल

संभाजी होळकर, पौर्णिमा तावरे, इम्तियाज शिकीलकर, वनिता बनकर, नितीन शेंडे, सुभाष ढोले, धीरज लालबिगे, साधू बल्लाळ, शब्बीर शेख, आशिष जगताप, अनिल लडकत, तानाजी कोळेकर, सतीश देशमुख, नरेंद्र गुजराथी, दिलीप ढवाण, पाटील, अविनाश गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, विशाल जाधव, संतोष जाधव, नवनाथ बल्लाळ, सुनिता बगाडे, कॉंग्रेसचे अँड. अशोक इंगुले व वैभव बुरुंगले तसेच शिवसेनेचे विश्वास मांढरे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

12 एप्रिलला बारामतीत बाहेरचे कोणी येऊन काही करण्याचा प्रयत्न केला तर त्या दिवशी राष्ट्रवादीतील ज्येष्ठांनी घराबाहेर पडू नये, युवक काय असेल ते बघून घेतील, आता आम्हाला अडवायच नाही, अशा शब्दात युवकांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. नुसत्या सभा घेऊन चालणार नाही प्रत्येकाने सोशल मिडीयासह सर्वच क्षेत्रात पक्षाची भूमिका मांडणे गरजेचे असल्याचे काही युवकांनी बोलून दाखविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com