राज्यात औरंग्याच्या कबरीहून राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावरुन राऊतांनी भाजपवर घणाघाच केला आहे.
"औरंगजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरुंगात डांबले किंवा खतम केले. लालकृष्ण अडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना ‘कैद’ झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही," असे विधान राऊतांनी 'सामना'तील 'रोखठोक'मध्ये केले आहे.
औरंगजेब चारशे वर्षांपासून थडग्यात विसावला आहे. त्या थडग्यावरून महाराष्ट्रात दंगल पेटवण्यात आली. नागपूरची निवड त्या दंगलीसाठी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची निवड कोणी केली काय? नवहिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला भाजपमधील बाटगे खतपाणी घालत आहेत. हा धोका महाराष्ट्राला आहे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.
औरंबजेबाच्या कबरीवरुन नागपुरात नुकताच हिंसाचार झाला. यावरुन राऊतांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे. नागपूरच्या दंगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका आहे हे मानायला मी तयार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात हे सर्व घडले. त्यामुळे फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी नागपूरची युद्धभूमी केली काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नागपूरच्या दंगलीने गृहखात्याचा डोलारा पोकळ पायावर उभा आहे हे दिसले व बीड, परभणीपासून नागपूरपर्यंत याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. गुजरातच्या दाहोदमध्ये 3 नोव्हेंबर 1618 ला औरंगजेबाचा जन्म झाला. तो दिल्लीत गेला व दिल्लीतून महाराष्ट्र काबीज करायला निघाला आणि महाराष्ट्रातच कबरीत गेला. औरंगजेबाच्या अनेक बेगम होत्या, पण हिराबाईवर त्याचे प्रेम होते. तीसुद्धा गुजरातचीच होती. आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांचीच सत्ता आहे व त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर उखडायची आहे. याच समर्थकांनी गांधी हत्यारा गोडसेचा गौरव केला व त्यांना हिटलरही प्रिय आहे. महाराष्ट्रात हे असे विष पसरवून नवहिंदुत्ववाद्यांना देशात अराजक माजवायचे आहे, असे राऊतांनी म्हटलं आहे.
आपली कबर अगदी साधी असावी, अशी इच्छा मरणापूर्वी औरंगजेबाने प्रकट केली होती.
वेरूळ लेण्यांच्या माथ्यावर वसलेले हे रोझा खुलताबाद म्हणजे एक थडग्यांचेच गाव.
खुलताबादच्या शीतल परिसरात औरंगजेबाची साधी कबर त्याच्या पराभवाचा इतिहास सांगत विसावली आहे.
शेख झैनुद्दीन या मुस्लिम संताने जिथे चिरनिद्रा घेतली त्या आवारात औरंगजेबाने आपले थडगे आधीच तयार करून ठेवले होते.
औरंगजेबच्या कबरीवर छप्परही नाही. थडग्याच्या पायऱ्या, बाजूचे जाळीचे कठडे संगमरवरी आहेत, परंतु ही कुंपणे नंतर झाली.
मोठ्या मोगल बादशहाची ही साधी कबर पाहून लार्ड कर्झनने काही बांधकाम करून घेतले असे म्हणतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.