
Hindi Imposition in Maharashtra Schools: येत्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी सक्ती करण्याची निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. याला मनसेने विरोध केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली भूमिका जाहीर केली आहे.
महाराष्ट्रात मराठी सक्तीची करा, मुख्यमंत्र्यांनी माय मराठी वर लक्ष दिले पाहिजे. मराठी भाषा कागदावर सक्तीची झाली आहे पण जोपर्यंत मराठी भाषा सक्तीचे होत नाही तोपर्यंत मराठी भाषेला स्थान मिळणार नाही. मराठी भाषेबाबत भाजपाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलं आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
देशात हिंदी विषयी आस्था व प्रेम आहे. ती संवाद भाषा आहे. पण अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती नको. जिथे हिंदी नाही तिथे सक्ती करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना इंग्रजी येत नाही म्हणून त्यांनी आमच्यावर हिंदी लादू नये, अशा शब्दात राऊतांनी सुनावलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बेळगावात मराठी भाषेवर इतका अत्याचार होत असताना भाजपच्या नेत्यांनी तोंडवर केलं आहे का? हिंदीला वैधता नसली तरी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. या महाराष्ट्रातून हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, नाटक यांचा उगम झाला आहे. पण जिथे हिंदी नाही तिथे हिंदीची सक्ती करू नका, असे राऊत म्हणाले. हिंदीचं विद्यार्थ्यांवर ओझ लादू नका. आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा, असा टोमणा राऊतांनी मोदी-शाह यांना लगावला.
कुठून तरी आलेला स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात, कधी हिंदू असतात, कधी मराठी असतात काहीतरी ठरवा, असे राज ठाकरे यांचे नाव न घेता राऊतांनी त्यांना चिमटा घेतला. देवेंद्र फडणवीसांचे नेते घाटकोपरला गेले आणि त्या ठिकाणी बोलले की घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यावर तु्म्ही बोलला नाहीत. हा सगळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा डाव चालला आहे फडणवीस यांना मराठी भाषा हिंदी भाषेविषयी प्रेम असल्याचे कारण नाही, असे राऊतांनी सांगितले.
राऊत म्हणाले, "लोकसभा- विधानसभेत त्यांनी हिंदू मुसलमान असा भेद करीत राजकारण केले. महापालिकेमध्ये ते आता प्रांतवाद करीत आहेत. राजकारणामध्ये काही सुपारीबाज लोक आहेत, ते अशा सुपाऱ्या घ्यायचे प्रयत्न करतात, पण मराठी नागरिक सुज्ञ आहेत,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.