मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ''संजय राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात, असा प्रश्न किरीट सोमय्यांनी राऊतांना विचारला आहे. बुधवारी सोमय्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
''निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची आहे ? ही सोमय्यांची कंपनी आहे. PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी 80 ते 100 कोटी रुपयांची रोकड घेतली. निकॉन कन्स्ट्रक्शनमार्फत दोन ठिकाणी जमीन घेतली. या कंपनीचे सर्व प्रकल्प रद्द करा, असे माझे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा,'' अशी मागणी राऊतांनी मंगळवारी केली.
''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर अलिबाग जवळ १९ बंगले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ते बंगले सोमय्यांनी दाखवावावे,'' असे राऊतांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यावर सोमय्या म्हणाले, ''१९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi Thackeray) ..यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे,''
''किरीट सोमय्यांना जोड्याने मारण्याची गोष्ट आहे की रश्मी ठाकरेंना संबोधून संजय राऊत बोलत आहेत. रश्मी ठाकरे यांनी आधीच्या दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला असून त्याआधीच्या सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईकच्या नावे आहे. हा कर किरीट सोमय्यांनी भरलेला नाही. संजय राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात?'' असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
सोमय्या म्हणाले, ''आता तुम्ही मीडियाला मी तुम्हाला, किरीट सोमय्यांना घेऊन जातो असं सांगत आहात, त्यापेक्षा रश्मी ठाकरे, मनिषा वायकर, मुख्यमंत्र्यांना घेऊन जा. खरं नाही तर घरपट्टी कशाला भरत आहेत ? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ही घरपट्टी भरण्यात आली आहे,''
''मी ग्रामपंचायतीतून याबाबत काही पुरावे मिळवले आहेत. हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे. त्यात ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी घरपट्टी नावे करण्याचा अर्ज आला असून मान्य करण्यात आल्याचं नमूद आहे. रश्मी ठाकरेंच्या नावाने घरं दाखवत आहेत. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी एप्रिल २०१४ मध्ये करार केला. त्यात घरं असल्याचे पुरावे त्यांनी जोडले आहेत. किरीट सोमय्या, नील सोमय्या यांनी जोडलेले नाहीत. हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे,'' असा टोला सोमय्यांनी लगावला आहे.
''हा ठाकरे सरकारच्या ग्रामपंचायतीने दिलेला पुरावा आहे. २००९ पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या,'' असे सोमय्या म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.