
मुंबई : घाटकोपर येथे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या स्वागत फलकावर 'हिंदुहृदय सम्राट' असं संबोधलं होतं, त्यावर सोशल मीडियावर 'हिंदू हृदयसम्राट' अशी चर्चा रंगली आहे. यावरुन मनसेने मनसैनिकांना फर्मान काढले आहे.
घाटकोपर येथील मनसे (MNS) कार्यालयाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते कार्यक्रम होता. यानिमित्ताने घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर राज ठाकरे यांचा 'हिंदुहृदयसम्राट' असा उल्लेख केला होता. आता या पोस्टरबाजीवर पक्षानं कार्यकर्त्यांना आदेश जारी केला आहे.
''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या उपाधी व्यतिरिक्त (मराठी हृदयसम्राट) इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे,'' अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, राजगड मध्यवर्ती कार्यालयातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
'हिंदुहृदयसम्राट' ही पदवी जनतेने उत्स्फूर्तपणे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांमुळे त्यांना जनतेने बहाल केली आहे , केवळ बाळासाहेब ठाकरे यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखलं जाईल असं शिवसैनिकांचं म्हणणं होतं. त्यानंतर अखेर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबत मनसैनिकांना आदेश देण्यात आला आहे.
याआधी राज ठाकरे यांचा मराठी हृदयसम्राट असा उल्लेख केला जात होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं होतं. त्यानंतर काल त्यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केल्यानंतर ही पक्षाकडून अशी कोणतीही उपाधी लावू नये अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मनसेने झेंडा बदलला. मनसेने हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे.
''महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या उपाधी व्यतिरिक्त (म्हणजे 'मराठी हृदयसम्राट' व्यतिरिक्त) इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे,'' अशा सूचना मनसेच्या फेसबूक पेजवरुन देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.