Sanjay Raut : राऊताचं नवं टि्वट ; मुश्रीफांचा फोटो पोस्ट ; "उद्या देवेंद्रजीकडे .."

Sanjay Raut on Bjp and Devendra Fadnavis : ईडीने मुश्रीफ यांना समन्स बजावलं आहे.
Sanjay Raut and Devendra Fadnavis
Sanjay Raut and Devendra Fadnavissarkarnama

Sanjay Raut on Bjp and Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने शनिवारी छापेमारी केली आहे.

कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुश्रीफ यांची सध्या चौकशी सुरु आहे. नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने मुश्रीफ यांना समन्स बजावलं आहे. त्यांना सोमवारी हजर राहण्याचा आदेश ईडीनं दिला आहे.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टि्वट करीत राष्ट्रीय तपास यंत्रणा, भाजपवर टीका केली आहे. "आपणही एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांकडे पाठवणार आहोत," असे संजय राऊतांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. राऊतांनी टि्वटमध्ये हसन मुश्रीफ यांचा फोटो पोस्ट केला आहे.

Sanjay Raut and Devendra Fadnavis
Congress : अधिवेशनात निलंबित झालेल्या रजनी पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी..

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडीकडून मुश्रीफांसह कुटुबीयांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत मुश्रीफांची थेट चौकशी झालेली नाही. दोनवेळा ते घरी नसतानाच ईडीकडून छापेमारी झाली आहे.

“मुश्रीफ यांच्या सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ED ची कारवाई सुरू आहे. महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. अशा डझनावर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. ed येथे गप्प का? उद्या एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्रजीकडे पाठवीत आहे, असं ट्वीट करत संजय राऊतांनी हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतानाचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

Sanjay Raut and Devendra Fadnavis
Shiv Sena : 'मातोश्री' वरील शिवसेना महिला नेत्याचा तो Video Viral ; गुन्हा दाखल

ईडीकडून मुश्रीफांच्या निवासस्थानी काल दिवसभरात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांनी कोणतीही कागदपत्रे यावेळी सोबत नेलेली नाहीत. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा तसेच मुलगा आबिद मुश्रीफ यांच्यासह पाज जणांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनाही बोलावून मुश्रीफ यांच्यासंदर्भात माहिती घेतली असल्याचे समजते.

आतापर्यंत मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुरगूडमध्ये 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com