Sanjay Raut : खासदार फुटीची राऊतांनी हवाच काढून घेतली; म्हणाले, 'शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेले 'अपेंडिक्स''

MP Sanjay Raut ShivSena Uddhav Balasaheb Thackeray Party MP DCM Eknath Shinde : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार यावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया.
Sanjay Raut 5
Sanjay Raut 5Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सहा खासदार फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत. 'ऑपरेशन टायगर' होणार असल्याचे संकेत मंत्री उदय सामंत यांनी दिले. या 'ऑपरेशन'ची शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हवाच काढून घेतली.

'ऑलरेडी ऑपरेशन 'रेड्याची शिंग' झालेलं आहे. तो आकडा चुकीचा सांगत आहे. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे. हा शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेले अपेंडिक्स आहे. देवेंद्र फडणवीस त्यांचे ऑपरेशन करत आहे', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

खासदार संजय राऊत म्हणाले, "'ऑपरेशन टायगर' होईल. 'ऑपरेशन कमळ' होईल. पण ऑलरेडी ऑपरेशन 'रेड्याची शिंग' झालेलं आहे. अशा अफवा पसरत असतात. आमचे सर्व खासदार उपस्थित होते. तो आकडा चुकीचा सांगत आहे. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे".

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी केली. 'ते कोणत्या गुंगीत आहे, ते समजून घेतलं पाहिजे. त्यांनी वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. आता साडेबारा वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत. महाराष्ट्राच्या मतदार याद्या, निवडणुकीत जे घोटाळे झाले आहेत, ते पुराव्यानिशी मांडणार आहेत', असेही सांगितले.

ऑपरेशन कसलं, घेऊन बसलात, असे सांगताना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचं रोज ऑपरेशन करत आहेत. रोज त्यांचा अपमान होत आहे. हा शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेले अपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल. आमच्या ऑपरेशन करण्यापेक्षा फडणवीस तुमचं रोज ऑपरेशन करत आहेत. त्याची काळजी घ्या, असा खोचक सल्ला दिला.

मंत्री मुंडेंबाबत CM अन् DCM यांना विचारा

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचाराचा आरोप न्यायालयाने अशंतः मान्य केला आहे. यावर त्यांनी राजीनामा द्यायला हवा काय? यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारा. अजित पवारांना विचारला पाहिजे. राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्रात महिला आयोग आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या महिला आयोगाला प्रश्न विचारा, असा टोला त्यांनी लगावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com