कोल्हापुरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवले ; संजय राऊतांचा टोला

भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : हनुमान जयंती निमित्त आज मनसे (MNS) आणि भाजपनं (BJP)भोंगे लावून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालिसाचं सामूहिक पठण देखील होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसे, भाजपवर निशाणा साधला आहे. ''कोल्हापूरचा निकाल लागला. त्याच वेळी काही लोकांनी भोंगे, हनिमान चालिसाचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत,''

Sanjay Raut
राऊत हे बोलवते धनी, उद्धव ठाकरे हेच मास्टरमाईंड ; सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल

''काही लोक हनुमान चालीसा म्हणण्यासाठी पुण्याला गेले, काहींनी भाड्याने हिंदुत्व घेतले, कोल्हापूर पोट निवडणूकमध्ये जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरविले, भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत, हिजाब वादानंतर आता हनुमानावरून राजकारण सुरू आहे. भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,'' अशा शब्दात राऊतांनी विरोधकांना सुनावले.

Sanjay Raut
चार दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

राऊत म्हणाले, "एमआयएमकडून भाजप जे राजकारण करू इच्छित आहे. त्याचा दाखला कोल्हापूरच्या निवडणुकीत मिळाला. शिवसेना प्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण लोकं असं स्वीकारत नाहीत. या भोंग्यांच्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळलं आहे. त्यामुळे आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचं राजकारण संपलं आहे"

सत्ता येत नाही, आमदार फुटत नाही, म्हणून काही लोकांना सुपाऱ्या दिल्यात. नवं हिंदू ओवेसी आणि खरा ओवेसी यांच्यांत दंगली घडवायचा आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करायचा असे आरोप राऊतांनी विरोधकांवर केले आहेत.

''रामनवमीच्या दिवशी 10 राज्यात दंगली झाल्या, उत्तर प्रदेश निवडणूक वेळी हिजाब मुद्दा आला नंतर नवीन मुद्दा आला, अनेकांना राष्ट्रगीत, वंदे मातरम म्हणता येत नाही. यांनी हनुमान चालिसाचे दोन ओळी तरी म्हणून दाखवाव्यात,'' असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com