राऊत हे बोलवते धनी, उद्धव ठाकरे हेच मास्टरमाईंड ; सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल

उद्धव ठाकरे हिम्मत असेल तर माझ्याशी आमने सामने चर्चा करा, माझं चॅलेंज आहे.
Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Kirit Somaiya, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedy) याला कुठे लपवलं आहे याची माहिती जनतेला द्यावी अशी मागणी करत भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी ठाकरे कुटुंबियांनी नंदकिशोर चतुर्वेदीसोबत मनी लॉन्ड्रींग केलं आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. सोमय्यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर (Uddhav Thackeray)निशाणा साधला आहे.

''श्री जी होम्समध्ये आलेले पैसे हे शेल कंपनीतून आले आहेत, हे पैसे बेनामी असल्याबाबत ईडी आणि आयटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, बेनामी संपत्ती घोषित करून श्री जी हाऊस बांधण्यात आलंय ती संपत्ती अटॅच करावी, '' असे सोमय्या म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
चार दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

किरीट सोमय्या म्हणाले, ''श्री जी होम्सचा खरा मालक कोण , हे लपवण्यासाठी लेयर तयार करण्यात आल्या, मनी लॉड्रींग प्रकरणी ईडीने कारवाई करावी असं आश्वासन दिल आहे. आदीत्य ठाकरेंचा ७ कोटींचा कोमोस्टॅाक एक्सचेंजचा घोटाळा आहे. संजय राऊत हे ठाकरे सरकारचे प्रवक्ते आहेत, संजय राऊत हे बोलवते धनी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मास्टरमाईंड आहेत,''

''माझ्यावर पीएपी लाटल्याचा आरोप केला, एकही आरोप सिद्ध झाला नाही, किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, निल सोमय्या यांना फसवण्याचा प्रयत्न केला जाते आहे, माझ्यावरील एकही पुरावा दिला नाही,'' असे सोमय्या म्हणाले. ''मी जेवढे घोटाळे बाहेर काढले त्यांना सगळे पुरावे दिले आहेत. उद्धव ठाकरे हिम्मत असेल तर माझ्याशी आमने सामने चर्चा करा, माझं चॅलेंज आहे,''असे सोमय्यांची सांगितले.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
PNB Scam : मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातली नऊ एकर जमीन जप्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com