Sanjay Raut Slams Shrikant Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचे चिरंजीव ठाकरेंच्या कृपेने दोनदा खासदार झाले ; राऊतांचा घणाघात

Maharashtra Politics : नारायण राणे व श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केलेल्या भाषणांवर राऊतांनी आक्षेप घेतले आहेत.
sanjay Raut , Shrikant Shinde
sanjay Raut , Shrikant Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : "उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघत नव्हते,अडीच वर्षांत अडीच दिवसच मंत्रालयात जाण्याचा विक्रम त्यांनी केला होता," असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी संसदेतील भाषणात केला होता. खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

राऊतांनी 'सामना'तील 'रोखठोक'मधून श्रीकांत शिंदेंवर घणाघात केला आहे. नारायण राणे व श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केलेल्या भाषणांवर राऊतांनी आक्षेप घेतले आहेत.

sanjay Raut , Shrikant Shinde
NCP Split : राष्ट्रवादीतील अस्थिरता, काँग्रेसचा सावध पवित्रा : ऐनवेळी वेगळा निर्णय घेतला तर..

“भाजपचे ‘नागडे पोपटलाल’ शिवसेना नेत्यांवर करतात तसे कमरेखालचे वार व खोटे आरोप केले नाहीत. मोदी मंत्रिमंडळातील महाराष्ट्राचे एक मंत्री नारायण राणे यांनी अविश्वास ठरावाच्या वेळी लोकसभेत केलेले भाषण मोदी यांनी ऐकायला हवे. महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणारे ते भाषण होतं”, अशी खंत राऊतांनी व्यक्त केली आहे.

sanjay Raut , Shrikant Shinde
Rahul Gandhi Visits Wayanad : राहुल गांधींना वायनाडचे आदिवासी म्हणाले, "परत याल तर पंतप्रधान बनूनच या"

"धोरणांवर टीका करणे हे वेगळे व खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे वेगळे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव हे उद्धव ठाकरे यांच्या कृपेने दोनदा खासदार झाले. त्यांनी संसदेत वापरलेली भाषा ही भाजपच्या नव्या संस्कृतीला शोभणारी आहे व हेच लोक आता भाजपच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहेत," असे राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे..

“महाविकास आघाडी सरकार असताना सर्व कामे थांबवण्यात आली. कारण, उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघत नव्हते. अडीच वर्षांत अडीच दिवसच मंत्रालयात जाण्याचा विक्रम उद्धव ठाकरे यांनी केला होता. २०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेनेला लोकांनी बहुमत दिलं होतं. पण, निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. बाळासाहेबांचे विचार विकून हिंदुत्वापासून लांब जाण्याचं काम त्यांनी केलं. १३ कोटी लोकांबरोबर गद्दारी यांनी केली”

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com