Sanjay Raut news : मुख्यमंत्र्यांच्या 'बाळराजेंवर' खासदार राऊतांचे आरोप !

Raut's demand to Prime Minister Narendra Modi to investigate the dubious financial transactions of Srikant Shinde Foundation : श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करा, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली मागणी..
Shrikant Shinde Sanjay Raut
Shrikant Shinde Sanjay RautSarakarnama
Published on
Updated on

Mumbai News : समाजातील गोरगरीब, होतकरू व्यक्तींना मदत करण्याबरोबरच विविध सामाजिक कार्यांसाठी संस्था, संघटनांना सढळ हाताने मदत करण्याचे काम श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने केले जाते. संस्थेच्या या कामाचे कौतुक करतानाच ही संस्था राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची आहे. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीचा आर्थिक स्राेत शोधून फाउंडेशनच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती कोठेही प्रसिद्ध केली जात नाही. ठाणे (Thane) जिल्हा धर्मदाय आयुक्तांकडे या फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, एक महिना उलटून गेल्यानंतरही त्याची साधी दखल धर्मदाय आयुक्तांनी घेतली नसल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. याबाबत राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र देत चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्तांकडे वारंवार माहिती मागितली असताही ही माहिती दिली जात नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shrikant Shinde Sanjay Raut
Gajanan Kale News: मनसे करणार उद्धव ठाकरेंचा दुधाने अभिषेक! गजानन काळेचं पत्र व्हायरल

निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यासाठी या फाउंडेशनचा वापर केला जात आहे. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवित आहेत. ते या फाउंडेशनचे प्रमुख आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक मोठे उपक्रम राबविले जातात. लाखो रुपयांची मदत केली जाते. मात्र, यासाठी फाउंडेशनकडे कोट्यवधी रुपयांचा निधी कोठून येतो, याची कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाज यांच्या नावाखाली पांढरा करण्याचा उद्योग या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. याची चौकशी करण्याची मागणी खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

देशात अलीकडेच 'चंदा दो चंदा हो हे प्रकरण गाजत आहे. सरकारने अनेक उद्योगपती, कंपन्या, ठेकेदारांना 'कामे देऊन भाजपच्या (BJP) खात्यात निवडणूक रोखेंच्या माध्यमातून आठ हजार कोटींचे धन जमा केले. माननीय सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे रद्द करताना सरकार आणि निवडणूक रोखे भाजपला देणारे यांचे Quid pro Quo (काहीतरी साठी काहीतरी) हा संबंध पुराव्यासह जोडला. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) फाउंडेशनकडे अशाच मागनि आलेल्या कोट्यवधीच्या रकमांचा 'मार्ग' गुन्हेगारी स्वरूपाचा, मनी लॉण्डरिंग प्रकारचा प्रथमदर्शनी दिसतो. ही बाब गंभीर आहे व आपण त्याबाबत तत्काळ गुन्हा नोंद करून साधारण 500 ते 600 कोर्टीच्या गैरव्यवहाराची चौकशी तत्काळ ईडी, सीबीआयकडे सोपवून गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

Shrikant Shinde Sanjay Raut
Sanjay Mandlik News: मंडलिक, माने यांचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांच्या उपस्थित आज अर्ज दाखल करणार

पैसे गोळा करायला मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष ?

श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. या फाउंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या (CM) कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाउंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेब धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्त केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या फाउंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान 500 कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com