अनंत गिते त्यावेळी शरद पवारांच्या पाया पडले होते

कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय, याची प्रशंसा देशभरात होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या साऱ्या कृतीचं भान राहिलेलं नाही.
Sharad Pawar-Sunil Tatkare-Anant Gite
Sharad Pawar-Sunil Tatkare-Anant GiteSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते हे गेली दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते, हे माहीत नाही. पण, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये गिते आले होते. त्यावेळी पवारसाहेबांसमोर वाकून नम्रपणे पायाला हात लावत महाआघाडीबद्दल आभार मानले होते. या घटनेचा मी साक्षीदार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर दिले. (MP Sunil Tatkare Gave Answer to Anant Gite's criticism)

माजी खासदार गिते यांनी रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुळातच खंजीर खुपसून झाला आहे. दोन्ही काँग्रेस असूनही एकमेकांचे तोंड पाहत नाहीत, अशी टीका केली होती. त्याला पत्रकार परिषद घेत तटकरे यांनी वरील दाखला देत उत्तर दिले. या वेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे हे उपस्थित होते.

Sharad Pawar-Sunil Tatkare-Anant Gite
...हा सल्ला मोदी-शहांना द्या! राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंचे खरमरीत उत्तर

ते म्हणाले की, अलीकडच्या काळात अनंत गिते यांची अवस्था राजकीयदृष्टया ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' अशी झाली आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी वरील वक्तव्य केले असावे. अनंत गिते बोलल्याने काही फरक पडत नाही; परंतु सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. आघाडीचे जनक आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय, याची प्रशंसा देशभरात होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या साऱ्या कृतीचं भान राहिलेलं नाही, असाही टोला सुनील तटकरे यांनी या वेळी लगावला.

Sharad Pawar-Sunil Tatkare-Anant Gite
वर्षभरांनी यशवंतराव गडाख यांच्या रंगल्या सवंगड्यांशी गप्पा : घेतला भाजीभाकरीचा अस्वाद

राष्ट्रवादी हा सिद्धांतावर, पवारांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असणारा पक्ष आहे. देशाच्या जडणघडणीतील शरद पवारांच्या उत्तुंग नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे अढळ स्थान कुणी बोलल्याने कमी होणार नाही, असेही तटकरे यांनी सुनावले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याला अनंत गिते हे उत्तर देतील, अशी भाबडी आशा शिवसैनिकांच्या मनात होती. परंतु २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गितेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षनेतृत्वाबद्दल अशाप्रकारची वक्तव्ये आली, त्यावेळी गळून पडला होता, असा घणाघाती आरोपही खासदार सुनील तटकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com