दसरा मेळावा : सत्य परेशान हो सकता है पराजित नही; उद्धव ठाकरेंचा दरारा कायम!

Arvind Sawant : त्यांनी काळी मांजर सोडण्याचा प्रयत्न करू नये...
 Uddhav Thackeray Latest News
Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन (Shivsena Dasara Melava 2022) वाद पेटला आहे. याबाबत शिवसेनेने उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असून न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली असून दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला न्यायालयाने परवानगी दिली आहे. (Shivsena Dasara Melava 2022 latest news)

 Uddhav Thackeray Latest News
बारामतीच नव्हे, महाराष्ट्रातल्या सर्वच जागा आम्हाला जिंकायच्या आहेत...

हा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या नेत्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत आणि आभार मानले जात आहे. यावर लगेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार राऊत म्हणाले की, न्याय व्यवस्थेचे आभार, आम्हाला न्याय मिळेल यावर आधीपासूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विश्वास होता. यामुळे परंपरेनूसार ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार आहे. आतापर्यंत शिवसेनेचे परंपरेनुसार मेळावे इथेच घेतले गेले. आताही इथेच होणार आहे. आमच्या मेळाव्यासाठी व्यत्यय आणण्यासाठी शिंदे गट आणि भाजपने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. आता आमची परंपरा सुरूच राहणार. त्यांनी काळी मांजर सोडण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा न्यायालय त्यांना धडा शिकवेल. आता असाच निर्णय सर्वोच्च न्यायालय देखील देईल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

 Uddhav Thackeray Latest News
Dasara Melava : शिंदे गटाला धक्का; शिवाजी पार्कवर आव्वाज ठाकरेंचाच !

दरम्यान आमची न्यायाची बाजू असून कायदा सुविधा बिघडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतच आलो आहोत. त्यांनीच आपल्या आमदारांना समज द्यावी, असा टोला देखील राऊतांनी शिंदेंना लगावला. तसेच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही. या निर्णयामुळे आजही उद्धव ठाकरे यांचाच दरारा असल्याचे अंधारेंनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com