जालना येथे सापडले 390 कोटींचे घबाड ; 58 कोटींची रोकड अन् 32 किलो दागिने

Jalna income tax department raid : आयकर विभागाने कोणालाही शंका येऊ नये यासाठी वाहनांवर 'दुल्हन हम ले जायेंगे' असे स्टीकर लावले होते.
Jalna income tax department raid
Jalna income tax department raidsarkarnama
Published on
Updated on

जालना : आयकर विभागाने (Income Tax Department,) जालना (Jalna) येथील एका स्टील कारखानदाराचे कारखाने आणि इतर मालमत्तांवर छापेमारी केली. या वेळी केलेल्या कारवाईत बेहिशोबी मालमत्तांचे धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. (Jalna income tax department raid)

स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. त्यात ५८ कोटींची रक्कम, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला.

कारवाई केलेल्या कारखानदाराचे नाव आयकर विभागाने अद्याप जाहीर केले नाही. ही कारवाई अद्यापही सुरु आहे. आयकर विभागाला संशय आहे की, या कारखानदाराचा काळा पैसा औरंगबाद येथली एक प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापारी गुंतवणूक करुन पांढरा करत आहे. याबाबतही शोधमोहिम सुरु आहे. आयकर विभाग कागदपत्रे आणि इतर बाबींची अद्यापही पडताळणी करत आहेत.

विशेष म्हणजे ही रक्कम मोजण्यासाठी पथकाला तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकारी, कर्मचारी यांच्यासह १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहचले होते.

आयकर विभागाने कोणालाही शंका येऊ नये यासाठी वाहनांवर 'दुल्हन हम ले जायेंगे' असे स्टीकर लावले होते. लोकांना वाटावे हे लग्नाचेच वऱ्हाड आहे. दरम्यान, हे वऱ्हाड इच्छित स्थळी पोहोचल्यावर आयकर विभागाने कारवाई सुरु केली. कारवाईत सापडलेली सर्व रक्कम स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेत नेऊन मोजण्यात आली.

Jalna income tax department raid
maharashtra cabinet : हवे असलेले खाते अन् बंगल्याचे पर्याय ; शिंदे-फडणवीसांची बहुपर्यायी पद्धत

ही रक्कम मोजण्यास सकाळी 11 वाजता सुरुवात झाली होती. रक्कम मोजून पूर्ण व्हायला रात्रीचे 1 वाजले. त्यासाठी १० ते १२ यंत्रे लागली. ३५ कापडी पिशव्यांत नोटांची बंडले पॅक केली. या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com