ST Bank Maharashtra : सदावर्तेंना एकामागून एक धक्के; एसटी बँकेचे तब्बल 25 हजार सभासद शिंदेंच्या संघटनेत करणार प्रवेश

State Transport Co-operative Bank Politics News : एसटी बँकेतील राजकारण तापले...
Eknath Shinde, Gunratan Sadavarte
Eknath Shinde, Gunratan SadavarteSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मेहुण्याची नियुक्ती केली होती. पण पुण्यातील सहकार आयुक्तांनी सदावर्तेंना दणका देत त्यांच्या मेहुण्याची एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हकालपट्टी केली आहे.

Eknath Shinde, Gunratan Sadavarte
Saurav Patil News : गुणरत्न सदावर्ते यांना धक्का, सहकार आयुक्तांनी केली हकालपट्टी....

याचे पडसाद म्हणजे या निर्णयानंतर सदावर्ते हे उद्ध्वस्त झालेल्या माणसासारखे वर्तन करत आहेत. सदावर्ते यांचे चाललेले माकडचाळे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणारा तणाव हे सर्व पाहता महाराष्ट्रातील एसटी कष्टकरी जनसंघाच्या एकूण सभासदांपैकी बहुतेकांनी आणि राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पदाधिकारी, आगार पातळीवरील पदाधिकारी यांनी ऑनलाइन बैठक घेतली. यानंतर सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला आहे, अशी माहिती बंडखोर संचालकांचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर विभागातील संभाजीनगर डेपोतील कष्टकरी जनसंघ बरखास्त करण्यात आला. अशा प्रकारे कोल्हापुरातून ही सुरुवात होऊन पूर्ण महाराष्ट्रात दिसून येईल. आणि एकूण सदावर्तेंसोबत असलेल्या 30 ते 35 हजार सभासदांपैकी जवळपास 25 हजार सभासद हे आमच्यासोबत आले आहेत. पुढील वाटचाल कशा प्रकारे करायची? हे ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित राष्ट्रीय कर्मचारी सेना आणि संघटनेचे अध्यक्ष किरण पावसकर हे कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहेत, असे संतोष शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोग कशा पद्धतीने देता येईल, तसेच इतर गोष्टींमध्ये कशा सुधारणा करता येतील? यासाठी आमच्या बैठका सुरू आहेत. पुढील काही दिवसांत बैठका संपवू. 25 हजार सभासद सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे संतोष शिंदे यांनी यांनी सांगितले.

edited by sachin fulpagare

Eknath Shinde, Gunratan Sadavarte
Kalyan Dombivli News : मुख्यमंत्री शिंदेंनी केलं लेकाचं कौतुक; कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत सूचक विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com