Mumbai : एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांना सहकार आयुक्तांनी दणका देत पदावरून हकलपट्टी केली आहे. पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे तसेच आरबीआयची पूर्वपरवानगी न घेता पदावर बसल्यामुळे सहकार खात्याने आधीच नाराजी व्यक्त केली होती. एसटी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे सौरभ पाटील हे नातेवाईक आहेत.
एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालकासाठी काही निकष आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने व्यवस्थापकाचे वय ३५ वर्ष पूर्ण असावे. त्यांना आठ वर्षांचा अनुभव असावा. व्यवस्थापकाच्या निवडीसाठी आरबीआयची परवानगी असावी, असे प्रमुख निकष होते. मात्र, या निकषांमध्ये सौरभ पाटील बसत नव्हते. मात्र, तरी देखील त्यांची नियुक्ती ही एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली होती. याविषयी सहकार आयुक्तांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी को-ऑप. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सौरभ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई सेंट्रल येथील एसटी को-ऑप. बँकेच्या मुख्यालयात कार्यवाहू अनिल भोसले यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र, पाटील यांच्या नियुक्तीनंतर अनेक जण त्यांच्या नियु्क्तीवर आक्षेप घेत होते. व्यवस्थापकीय संचालकासाठी असलेल्या निकषांमध्ये पाटील हे बसत नसल्याचा प्रमुख आक्षेप होता.
मागील काही महिन्यांत एसटी बँकसंदर्भात मोठी घटना घडली ती म्हणजे यातील मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेण्यात आल्या. अंदाजे ४०० कोटी रुपयांच्या ठेवू बँकेतून काढल्याची चर्चा होती. त्यानंतर एसटी बँकेच्या संचलाक मंडळानेही नाराजी व्यक्त केली होती. ठेवी काढल्या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले होते.ठेवी काढल्यानंतर संचालक मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. आता सहकार आयुक्तांकडून पत्र लिहून सौरभ पाटील यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. तसेच नवीन नव्या संचालकांची नेमणूकीची सुचना केली होती.
सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या कारवाई म्हणजे सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जातो आहे. बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांच्या पॅनलने एक हाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर सौरभ पाटील यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण ते निकषात बसत नसल्याने सहकार आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. आत थेट त्यांना काढण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.