
Manoj Jarange Patil Protest: Key Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मुंबई पोलीस दल ॲक्शन मोडवर आले आहे. मुंबई शहरात तब्बल 50 हजार पेक्षा जास्त तर, नवी मुंबईत दहा हजार पेक्षा जास्त पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.
रस्ते मोकळे करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील चौकाचौकात पोलीस कर्मचारी आंदोलकांचे रस्त्यावर लावलेली वाहने हटवत आहेत. मराठा आंदोलकांना वाहन पार्किंग करण्यासाठी पार्किंग झोन दिलेले आहेत. त्यानुसार मराठा आंदोलकांशी समन्वय साधून वाहन पार्किंग झोनला घेऊन जात आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचा आदेश काढला. यानंतर मुंबई पोलीस दल ऍक्टिव्ह मोडवर आले. रात्रीतूनच मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये बंदोबस्त वाढवला. मुंबई शहरालगत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये देखील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यामुळे छावणीचे स्वरूप आलं आहे.
पोलीस दल आंदोलकांशी समन्वयाची भूमिका ठेवून आहे, कोणत्याही आंदोलकांशी वाद न घालता गाडी पार्किंग झोन पर्यंत घेऊन जात आहेत. कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु सायंकाळी चार वाजल्यानंतर पोलीस आणखी वेगाने कारवाई करतील, असे संकेत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मराठा आंदोलकांच्या वाहने कमी झाली आहेत. परंतु आंदोलन स्थळांकडून गावी परतणाऱ्या आंदोलकांची संख्या वाढली आहे. अटल सेतूवरील टोल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून 150 ते 200 वाहने परत गेली असल्याची माहिती मिळाली. तुलनेत मुंबईत दाखल होणाऱ्यांची मराठा आंदोलकांची वाहने कमी होती. खाद्यपदार्थ घेऊन जाणारी वाहने मात्र अटल सेतूवरून मुंबईत सोडण्यात येत आहेत.
दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची होत आहे. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीच्या अंमलबजावणीवर काय निर्णय होतो यावरून पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे. परंतु आंदोलन हे लांबणार असल्याची गृहीत धरून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा आंदोलकांनी तयारी सुरू केली आहे.
मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांची सरकार आणि प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याचे आरोप होत आहेत. पण कितीही त्रास द्या. पण पाटील म्हणतील तसं, मुंबई आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नसल्याचा निर्धार मराठा आंदोलकांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले आहेत. तिथं मात्र आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दल ॲक्शन मोडवर आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी मुंबई पोलीस दलाने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.