
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आंदोलनाची परवानगी नाही. जे सुरु आहे ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करा आणि मुंबई सोडा, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरू असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व मराठा आरक्षण आंदोलकांना दिले आहेत. यावेळी राज्य सरकारनेही कायद्यानुसार कारवाई करू असे आश्वासन न्यायालयाला दिले आहे.
मागील 5 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान, मराठा आरक्षण आंदोलकांनी दक्षिण मुंबईमध्ये विविध ठिकाणी आसरा घेतला होता. यातील काही आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सवरतीही थांबले होते. मात्र या आंदोलकांनी रेल्वे स्टेशन्स तसेच रस्त्यांवर उतरून मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले. या कृतीवर उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले.
मुंबई हायकोर्टाने अत्यंत कडक शब्दांमध्ये आंदोलनावर निरीक्षण नोंदवत दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन झाल्यास आपण स्वत: रस्त्यावरून उतरून पाहणी करू, असेही कोर्टाने म्हटले आहे. आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी सरकारची परवानगी नाही. जे काही सुरु आहे ते बेकायदेशीर सुरु आहे. आम्हाला शहर पूर्ववत हवं आहे, असे म्हणत आंदोलकांनी आणि मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई सोडावी असे आदेश दिले.
कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना बाहेर जाण्यास सांगितले जाईल. पण मनोज जरांगे पाटील यांचे ते कशी समजूत काढणार, हा मोठा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार ते आझाद मैदान सोडणार का, दुसरीकडे आंदोलन करण्याचा पर्याय स्वीकारणार का, राज्य सरकार त्यांना परवानगी देणार का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.