BMC elections 2025 : मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुस्लिमबहुल भागातील 18 वॉर्ड ठरणार कळीचा मुद्दा

Muslim-majority wards Mumbai News : आगामी काळात होता असलेला महापालिका निवडणुकीचा शिवधनुष्य पेलण्यासाठी महायुती एकत्रित असणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच पुन्हा एकदा महायुतीची तयारी सुरु झाली आहे.
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली होती. मात्र, आगामी काळात होता असलेला महापालिका निवडणुकीचा शिवधनुष्य पेलण्यासाठी महायुती एकत्रित असणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच पुन्हा एकदा महायुतीची तयारी सुरु झाली आहे.

त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं आदेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची बैठक त्यानंतर राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. दुसरीकडे मुस्लिमबहूल विभागातील 18 वॉर्डावरून भाजपपुढे पेच निर्माण झाला असून त्यावरही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यातील महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर सुटला आहे. गुरुवारी रात्री हायकमांडच्या आदेशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असून गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर पडदा पडला. त्यानंतर शिंदे यांची शिवसेना व भाजप राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढविणार आहे.

राज्यातील आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. त्यानुसार भाजप 130-140 जागा लढविणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80-90 जागा देण्यात येणार आहेत. या फॉर्म्युल्यावर बैठकीत एकमत झाल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे महायुतीमध्ये मुंबईतील मुस्लिमबहूल विभागातील 18 वॉर्डावरून भाजपपुढे पेच निर्माण झाला असून त्यावरही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, मुस्लिमबहूल असलेल्या 18 वॉर्डात भाजपला जोरदार विरोध होत असल्याने या जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्याचा भाजपचा विचार आहे. भाजपच्या (BJP) तुलनेत शिंदे सेनेनबद्दल मुस्लिम मतदारात कमी विरोध आहे.

त्याशिवाय या 18 वॉर्डात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या जागा सोडण्याचा विचार देखील आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर देण्यात येणार असल्याने त्यांच्या नावाला भाजपकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे सध्या भाजपपुढे या 18 जागावरून पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात या जागेवर भाजप काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागले आहे.

त्यासोबतच या दोन नेत्यांच्या बैठकीत कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर या शहरांमध्ये युती म्हणूनच सामोरे जाण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद देत नेमके या बैठकीत काय झाले याची माहिती दिली आहे. मुंबईसह प्रमुख पालिकेत युती व्हावी याबाबत आमच्यात सकारात्मक चर्चा झाली.', अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

महायुतीबाबत समिती करून घेणार निर्णय

'महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे. आमच्या झालेल्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. समिती तयार करून पुढील निर्णय घेण्यात येईल. समिती तयार करून प्राथमिक पातळीवर चर्चा केली जाईल. मुंबईसह प्रमुख महापालिकेत युती व्हावी. सर्व ठिकाणी महायुतीतच निवडणूक लढवण्याबाबत आम्ही सकारात्मक चर्चा केली.' त्यामुळे आता महायुती सर्व महापालिका निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी स्थानिक पातळीवर 4-5 पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या स्थापन केल्या जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असे देखील रवींद्र चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com