महाआघाडीत बिघाडी? भाई जगतापांची थेट उच्च न्यायालयात धाव

राहुल गांधी हे 28 डिसेंबरला मुंबईत येत आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्याला राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही.
Rahul Gandhi and Bhai Jagtap

Rahul Gandhi and Bhai Jagtap

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने (Congress) या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी केली आहे. यासाठी पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे 28 डिसेंबरला मुंबईत येत आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्याला राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. यामुळे महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवर उच्च न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे.

राहुल गांधींचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार आहे. या मेळाव्याला परवानगी देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही. यामुळे सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अखेर या प्रकरणी मुंबई काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या यावर सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी ही याचिका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केली आहे.

<div class="paragraphs"><p>Rahul Gandhi and Bhai Jagtap</p></div>
मुंबई पोलीस कंगनाला अटक करणार नाहीत पण एका अटीवर...

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागला असून, ओमिक्रॉनचाही धोका वाढला आहे. यामुळे राहुल गांधींच्या आगामी दौऱ्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी विचारणा करण्यात आली होती. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर राहुल गांधींच्या दौऱ्याला परवानगी देण्याबाबत आम्हाला विचार करावा लागेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

<div class="paragraphs"><p>Rahul Gandhi and Bhai Jagtap</p></div>
तुम्हाला मोदींच्या फोटोची लाज वाटते का? उच्च न्यायालयाची विचारणा

काँग्रेसने राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पक्षाच्या स्थापना दिनी 28 डिसेंबरला हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी शहरात तब्बल 10 लाख नवीन पक्ष सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे. याचबरोबर 10 हजार बूथवर डिजिटल सदस्यता मोहीम सुरू केली जाणार आहे. याचबरोबर राहुल गांधींची भव्य सभा शिवाजी पार्कवर घेण्याचे नियोजन आहे. मुंबई महापालिकेच्या मागील 2017 मधील निवडणुकीत शिवसेना प्रथम स्थानी तर भाजप दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या स्थानी होती. आता काँग्रेसने आक्रमकपणे पाऊले उचलत स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीला होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com