'मुंबई क्रिकेट'ची पोलिसांना 'गुगली' ; १४ कोटी थकविले ; ३५ पत्रांना केराची टोपली

थकबाकी वसूल करण्यासाठी गलगली यांनी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहिले आहे.
Mumbai Cricket Association
Mumbai Cricket Associationsarkarnama
Mumbai Cricket Association
शिवसेनेनं 'जनाब बाळासाहेब ठाकरे' स्वीकारलयं ; फडणवीसांनी डिवचलं

मुंबई : ''क्रिकेट सामन्यांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई पोलिस सुरक्षा पुरवतात. यासाठी शुल्क आकारण्यात येते. पण मुंबई क्रिकेट असोसिएशने (Mumbai Cricket Association) पोलिसांचे १४.८२ कोटी रुपये थकविले आहेत,'' अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

थकबाकी वसूल करण्यासाठी गलगली यांनी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहिले आहे. ''थकबाकी आधी वसूल करा, त्यानंतरच क्रिकेट सामन्यास सुरक्षा द्या,'' अशी मागणी गलगली यांनी पोलीस आयुक्त पांडे यांना केली आहे. थकबाकी वसुल करण्यासाठी पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला 35 स्मरणपत्रे पाठविली, पण मुंबई क्रिकेट असोसिएशनने या पत्रांना केराची टोपली दाखवली.

''वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे, असे गलगली म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांना अनिल गलगली यांनी पत्र पाठवून मागणी केली आहे. ''मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 14.82 कोटी थकबाकी वसूल न होइपर्यंत कोठल्याही क्रिकेट सामन्याला सुरक्षा न देणे आणि थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करावी,'' अशी मागणी गलगली यांनी पत्रात केली आहे.

Mumbai Cricket Association
शिवसेनेनं 'जनाब बाळासाहेब ठाकरे' स्वीकारलयं ; फडणवीसांनी डिवचलं

मुंबई पोलिसांनी गेल्या आठ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष 2013 मध्ये झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, 2016 चा विश्वचषक टी -20, सन 2016 मधील कसोटी सामने, 2017 आणि वर्ष 2018 मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे 14 कोटी 82 लाख 74 हजार 177 रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत.

९.५ टक्के व्याज आकारणार

असोसिएशनने गेल्या आठ वर्षात फक्त 2018 च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले 1.40 कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना 35 स्मरणपत्रे पाठवली आहेत. थकबाकी जमा करावी अन्यथा या थकबाकी रक्कमेवर 9.5 टक्के व्याज आकारले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गृहखात्याचा ढिम्म प्रतिसाद

''1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना 9 वेळा पत्रव्यवहार केला आहे पण ढिम्म गृह खाते प्रतिसाद देत नाही. मी याबाबत पत्रव्यवहार करत असून मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नाही,, असे गलगली यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com