Mumbai hoarding collapse : लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाच्या भ्रष्ट एकीमुळे मतदानापूर्वी मुंबईचे वास्तव उघड्यावर...

Mumbai News : मुंबईतील जनतेच्या आयुष्याचा विषय कोणत्याही पक्षाला गांभीर्यानं घ्यावासा वाटतो की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
Mumbai hoarding collapse
Mumbai hoarding collapsesarkarnama

Mumbai News, 14 May : महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभेसाठी ( Lok Sabha Election 2024 ) मतदान पार पडलं आहे. शेवटच्या अर्थात पाचव्या टप्प्यात मुंबई आणि परिसरात 20 मेला मतदान होणार आहे. यातच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भ्रष्ट एकीनं महानगराचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला आहे. परळच्या रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत झालेले मृत्यू, योग्य परवानग्या नसलेले विमान कोसळून झालेला मृत्यू या घटनांच्या मालिकेत घाटकोपरमधील होर्डिंग ( Ghatkopar Hoarding Fall ) पडून झालेल्या घटनेची भर पडली आहे.

मुंबईतील ( Mumbai ) जनतेच्या आयुष्याचा विषय कोणत्याही पक्षाला गांभीर्यानं घ्यावासा वाटतो की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय समाजमाध्यमांवर चर्चेत आणला आहे. अनधिकृत होर्डिंगची तक्रार करूनही याबाबत कोणतीही कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबईतच्या पोटात दडलेय काय, याचा अंदाज कधीच कुणाला येत नाही. महानगराला विद्रूप करणाऱ्या प्रत्येक घटकामुळे आज पुन्हा निष्पापांचे जीवन संपले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद, गद्दार, मराठी टक्का, खोके या सगळ्या चर्चेमध्ये सर्वाधिक महसून देणाऱ्या महागरातील सामान्य नागरिकांचे जीवनमान हा सर्वाधिक महत्वाचा विषय हरवला जात असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. पावसानं विस्कळीत झालेल्या लोकलमुळे घरी जाण्यासाठी अडकलेले नागरिक आणि सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्यानं अचानक ठप्प झालेली लोकल, या मुंबईतील सार्वजनिक सेवा जीर्ण झाल्याचे चीड आणणारे दर्शन घडत आहेत. पण, निवडणुकीत हे मुद्दे केव्हा आश्वासनांचा विषय ठरतील, याबद्दर नागरिक आवाज उठवत प्रचारही करत होते. मृत्यूच्या दारात नेणाऱ्या सापळ्यांकडे सत्ताधारी वर्गाचे आणि प्रशासानाचं लक्ष तरी असते काय? असा संतप्त प्रश्न विचारला जातोय.

Mumbai hoarding collapse
Mumbai Hoaring Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 74 जणांना वाचवण्यात यश

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी मोरवीत पूल तुटल्यानं अनेकांचा मृत्यू झाला होता. लखनौतही निवडणुकीसाठी साडीवाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली होती. पश्चिम बंगालमध्ये पूल कोसळून झालेले अपघाती मृत्यूच्या घटनांचे स्मरण करून देणारी घाटकोपरमधील ही घटना सुन्न करणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Mumbai hoarding collapse
Mumbai Hoaring Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 74 जणांना वाचवण्यात यश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com