Mumbai: मुंबईत पहिल्यांदाच कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल! अज्ञात व्यक्तीच्या शोधात पोलीस; नेमकं काय घडलंय?

Mumbai Kabootar Khana: राज्य सरकारनं कबूतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबई महापालिकेकडून देखील कबूतरखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Mumbai Kabootar Khana
Mumbai Kabootar Khana
Published on
Updated on

Mumbai Kabootar Khana: मुंबईत पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई महापालिकेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्यामुळं परिसरात अस्वच्छता पसरत असल्याची तक्रार महापालिकेनं पोलिसांकडं केली होती.

Mumbai Kabootar Khana
Devendra Fadnavis: पुण्यातील दादागिरी मोडून काढणारच! CM फडणवीसांचा निर्वाणीचा इशारा; म्हणाले, यासाठी जो मदत करेल...

या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीनं सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना वारंवार खाण्यासाठी खाद्य टाकून नियमांचा भंग केल्याचा आरोप आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. मुंबईसारख्या महानगरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेनं काही विशिष्ट ठिकाणी कबुतरांना अन्न देण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही काहीजण हे नियम पाळत नसल्यामुळं ही कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai Kabootar Khana
Somnath Suryavanshi: सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी अखेर FIR दाखल; कोणाचा समावेश? नेमकं काय म्हटलंय?

राज्य सरकारनं कबूतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबई महापालिकेकडून देखील कबूतरखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेकडून कबूतरखान्यातील एक खोली तोडण्यात आल्यानंतर त्याठिकाणी असणाऱ्या खाद्याची पोती देखील महापालिकेनं जप्त केली आहेत. सोबतच त्याठिकाणी असणारी वीज देखील कापण्यात आली आहे, आता महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कबूतरखान्याभोवती बांबू बांधून त्याठिकाणी जाळी टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

Mumbai Kabootar Khana
Sunil Tatkare: "1978 नंतर... पुन्हा एकदा पवारांना मुख्यमंत्रीपद"; सुनील तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय?

दादरच्या कबूतरखाना परिसरात महापालिकेकडून आता शेड बांधण्याचं काम हाती घेण्यात आल्यानंतर समोर असणाऱ्या जैन मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर जैन बांधव उपस्थित झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com