Kirit Somaiya vs Uddhav Thackeray : धक्कादायक बातमी : ठाकरेंच्या किल्ल्यात लाखभर बांग्लादेशी; सोमय्यांनी फोडला बॉम्ब

Lok Sabha Election 2024 Mumbai North East Constituency Kirit Somaiya Uddhav Thackeray : उत्तर मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांनी मिहीर कोटेचांचा पराभव केला आहे.
Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Kirit Somaiya, Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai Loksabha : मुंबईत सपाटून मार खाल्ल्यावर या निवडणुकीत 'आपण का हरलो' वर कागदी घोडे नाचवणारे काही भाजप नेते 'चिंतन' करीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मिहीर कोटेचा यांना मुंबईतील उत्तर-पूर्वमधून पराभवाचे तोंड का पाहावे लागले, यावर तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी धक्कादायक आकडेवारी पुढे आणून भाजपच्या पराभवाचे खापर चक्क बांगलादेशींवर फोडले. 'कोटेचा यांचा पराभव बांगलादेशींमुळे झाला', असे ट्विट सोमय्यांनी केले आहे.

सोमय्यांच्या या दाव्यानुसार, मुंबईतील एकट्या मानखुर्दमध्ये लाख-सव्वालाख बांगलादेशी असल्याकडे लक्ष वेधले आहे. निवडणुकीतील जय-पराजयाला सोमय्यांनी बांगलादेशी ‘कनेक्शन’ जोडल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची भीती आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील जवळपास 30 हजार मतांनी विजयी झाली. त्यांच्याविरोधात कोटेचांना 4 लाख 21 हजार 76 मते मिळाली. सोमय्यांनी या पराभवाचे खापर बांग्लादेशींवर फोडताना विधानसभानिहाय मतदारसंघाची आकडेवारीच ट्विट केली आहे.

सोमय्यांच्या आकडेवारीनुसार मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पाटलांना तब्बल 1 लाख 16 हजार 72 मते मिळाली. तर कोटेचा 28 हजार 101 पर्यंतच धाव घेऊ शकले. इथेच ठाकरेंच्या शिलेदाराचा विजय निश्चित झाला.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अन् महायुतीला निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी...; अजित पवारांना विश्वास !

सोमय्यांना या लीडवरूनच बांग्लादेशींची आठवण झाली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कोटेचांचा 29 हजार 861 मतांनी पराभव झाला. मानखुर्दमध्ये 87 हजार 971 मतांनी ते मागे पडले. पण मुलूंड आणि घाटकोपरमध्ये 58 हजार 110 मतांनी पुढे होते, असे सांगता सोमय्यांनी मानखुर्द या एकमेव विधानसभा मतदारसंघात (बांग्लादेशी एरिया) उध्दव ठाकरेंच्या सेनेला मिळालेल्या मतांचा उल्लेख करत पाटलांचा विजय बांग्लादेशींमुळे झाल्याचा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एनडीएतील नेत्यांकडून वोट जिहादचा मुद्दाही प्रचारात आणला होता. उध्दव ठाकरे यांच्याकडून मतांसाठी अल्पसंख्यांकांना गोंजारले जात असल्याचा आरोप सतत एनडीएतील नेते करत होते. आता निवडणुकीनंतर सोमय्यांनी एकप्रकारे त्याकडेच बोट दाखवले आहे. तर राज्यातील मंत्री दीपक केसरकर यांनीही ठाकरेंचा विजय अल्पसंख्यांकांच्या मतांमुळेच झाल्याचा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com