Mumbai Lok Sabha Election : राज्यात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघाची निवडणूक आहे. ही लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची आणि तितकेच चर्चेची बनली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून सर्वत्र प्रचाराचा धडाका सुरु आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) महायुतीची समारोप सभेसाठी मनसेला शिवाजी पार्क येथे पालिका आणि राज्य सरकारच्या नगरविकास खात्याची परवानगी मिळाली आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटही बीकेसी (BKC Ground) मैदानाची चाचपणी करणार असल्याचे समजते. येत्या 17 मे रोजी शिवाजी पार्क येथे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. ठाकरे गटाकडूनही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता.
मुंबईतील सहा मतदारसंघासाठी (Mumbai Loksabha Election) येत्या 20 मे ला पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे अजून तरी मुंबईमध्ये मोठ्या प्रचार सभा सुरु झालेल्या नाहीत. राज्यातील इतर भागात नेतेमंडळींच्या सभांचा धडाका सुरु आहे. राज्यातील इतर मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यामुळे आता सर्वच पक्षांनी मुंबईकडे लक्ष वळवले आहे. त्यामुळे मुंबईतील मध्यवर्ती भागात सभेसाठी जागा शोधण्याचे काम राजकीय पक्षांकडून होत आहे.
मुंबईतील मतदानाला 10 दिवस बाकी असल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. पंतप्रधान मोदी हे 17 मे रोजी मुंबईत येत आहेत. आता मुंबईमध्ये सभाचा सपाटा सुरु होणार आहे. भिवंडी, कल्याण , ठाणे, उत्तर मुंबई , उत्तर-पश्चिम मुंबई , उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघातील मतदान होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.