BMC Election : मुंबईच्या रणसंग्रामात 1700 उमेदवार; लक्ष मात्र शिवसेना उबाठा अन् भाजपच्या 7 हायव्होल्टेज लढतींकडे

Mumbai Municipal Election: 1700 Candidates in Race, Shiv Sena UBT Fields 4 Mayors, BJP 1 : मुंबई महापालिका निवडणुकीत 1700 उमेदवारांमध्ये पाच महापौर आणि दोन उपमहापौर पुन्हा आपलं नशिब आजमावत आहे.
Mumbai mayor
Mumbai mayorSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Corporation election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 1700 उमेदवार उतरले असून, जिंकण्यासाठी घमासान सुरू आहे. या निवडणुकीत महापौर आणि उपमहापौरपदे भूषवलेल्या सात मातब्बरही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून चार महापौर, दोन उपमहापौर आणि भाजपकडून एक उपमहापौर यांना विरोधकांनी कडवं आव्हान उभं केलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सेना पक्षाकरडून मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर या चार माजी महापौरांना, तर सुहास वाडकर, हेमांगी वरळीकर या दोन उपमहापौरांना तिकिट दिली आहेत. भाजपकडून माजी उपमहापौर अलका केरकर निवडणूक लढवत आहेत. महापालिकेत काम करण्याचा अनुभव असलेल्या या मातब्बरांना मतदार पुन्हा संधी देणार की घरी बसवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे माजी विभागप्रमुख असलेले मिलिंद वैद्य 1996-97 मध्ये मुंबईचे (Mumbai) महापौर होते. ते शिवसेना ठाकरे पक्षाकडून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे राजन सुरेश पारकर आणि दोन अपक्षांचे आव्हान असणार आहे. शिवसेनेतील फुटीमुळे माजी आमदार सदा सरवणकर एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आहेत. त्यामुळे वैद्य यांच्या विजयाचा मार्ग सोपा नाही.

Mumbai mayor
Hindu student forced to offer namaz : खळबळजनक! चार दिवसापूर्वी काॅलेजला प्रवेश; अहिल्यानगरमधील हिंदू विद्यार्थिनीला नमाजासाठी जबरदस्ती!

शिवसेना ठाकरे पक्षाकडून माजी महापौर विशाखा राऊत रिंगणात आहेत. त्या 1997-98 मध्ये महापौर होत्या. सध्या त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या प्रिया सरवणकर-गुरव यांचे आव्हान आहे. त्या माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आहेत. या प्रभागात केवळ दोनच उमेदवार असल्याने थेट लढत होणार आहे.

Mumbai mayor
Sushma Andhare Allegations: सुषमा अंधारे यांचा 'व्हिडिओ बॉम्ब'; अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची दहशत अन् ठोकशाही!

शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मैदानात उतरल्या आहेत. 2019-22 मध्ये त्या मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या रूपल राजेश कुसळे यांच्यासह बसप, वंचित बहुजन आघाडी आणि सात अपक्षांचे आव्हान आहे. त्यामुळे पेडणेकर यांची वाट बिकट असणार आहे.

2009-12 या कालावधीत मुंबईच्या महापौर असलेल्या श्रद्धा जाधव शिवसेना ठाकरे सेना पक्षाकडून उमेदवारी करत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या पार्थ बावकर आणि बंडखोर विजय इंदुलकर यांचे आव्हान आहे. इंदूलकरामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची मतविभागणी होण्याचा धोका आहे. त्याशिवाय वंचित, बसप आणि तीन अपक्षही या प्रभागातून लढत आहेत.

माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर हे शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्यासमोर सूर्यकांत कोळी या स्वपक्षाच्या बंडखोरासह शिवसेनेचे प्रल्हाद वरळीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित नागवेकर यांचे आव्हान असणार आहे. कोळी यांच्या बंडखोरीमुळे वरळीकर यांना मतविभाजनाचा सामना करावा लागू शकतो.

ॲड. सुहास वाडकर हे माजी उपमहापौर असून, शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे राहुल उगले, शिवसेनेच्या मानसी पाटील यांच्यासह इतर चार उमेदवारांचे आव्हान आहे. माजी उपमहापौर अलका केरकर या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या दिप्ती काते यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, बसप आणि दोन अपक्षांचे आव्हान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com