
Mumbai election preparation : जानेवारीअखेर होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मतदानाच्या दिवशी 70 हजार कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. पोलिंग मॅनेजमेंटसाठी साडेतीन हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
सध्या 500 पोलिंग मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. वाढलेल्या मतदारांमुळे बूथ संख्येत दहा टक्क्यांनी वाढ करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. यावर आलेल्या हरकती सूचनांवर सुनावणी काही दिवसांपूर्वी पार पडली. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार आहे. पालिका निवडणुकीची तयारी पालिकेने सुरू केली असून आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. बूथच्या संख्येत 1100 ने वाढ करण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फे नियुक्त अधिकृत अधिकारी इकबालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली. त्यात 337 हरकतींचा निपटारा करण्यात आला.
6 ऑक्टोबरला प्रभागरचना अंतिम अहवाल आणि मतदार (Voter) यादी जाहीर केली जाणार आहे
डिसेंबरपर्यंतच्या दुसऱ्या आठवड्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
मुंबईतील प्रभागरचना प्रक्रियेदरम्यान तब्बल 494 सूचना व हरकतींपैकी 337 हरकतींचा निपटारा
मागील विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवरील मतदारसंख्या 1200 ते 1400 इतकी होती. पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक बूथवरची मतदारसंख्या 1100 ते 1200 इतकी ठेवण्यात येणार आहे. यामुळे एकूण बूथची संख्या 10 टक्क्यांनी वाढवण्यात आली असून ती 10 हजार 111 वरून 11 हजार 222 इतकी होणार आहे.
प्रभाग क्रमांक 95 व 96 सुमारे 1400 कुटुंबांचे नावे प्रभाग क्रमांक 95 ऐवजी 96 मध्ये हलवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. खाटीक समाजातील सुमारे 80 लोकांनी विकासासाठी त्यांना पुन्हा प्रभाग क्रमांक 95मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
वॉर्ड क्रमांक 169 व 170 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी आणि 250 नागरिकांनी हरकत नोंदवली होती. रजा मार्ग, कुर्ला कदम सोसायटी, शमीम टॉवर, एमएमसेल बिल्डिंग, एसआरए कॉलनी, बुद्धविहार आदी भाग प्रभाग क्रमांक 170मध्ये टाकल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या भागात एकूण तीन हजार मतदार असून त्यापैकी साधारण 1500 जण मतदार मतदान करतात.
पालिका निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी चार हजार कर्मचारी आधीच नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर पाच अधिकारी आणि एक राखीव कर्मचारी म्हणजे एकूण सहा मतदान कर्मचारी असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.