Ujjwal Nikam: ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आरोपीचा आक्षेप;...ते आता भाजपचे नेते

Accused Vijay Palande Challenges Appointment of Adv Ujjwal Nikam: ॲड. उज्ज्वल निकम भाजपतर्फे निवडणूक लढले. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदलेला आहे. ते आता भाजपचे नेते आहेत, असे पालांडे याने याचिकेत म्हटले आहे.
Ujjwal Nikam
Ujjwal NikamSarkarnama

Vijay Palande : राज्य आणि देशपातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले लढविणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी धूळ चारली. निवडणुकीतील दारुण्य पराभवानंतर निकम यांची पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. निकमांच्या नियुक्तीला आता एका आरोपीने विरोध केला आहे.

विजय पालांडे याने सोमवारी ॲड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे, असे पालांडेने अर्जात म्हटले आहे. ॲड. उज्ज्वल निकम भाजपतर्फे निवडणूक लढले. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदलेला आहे. ते आता भाजपचे नेते आहेत, असे पालांडे याने याचिकेत म्हटले आहे.

उत्तर मध्य मतदारसंघातून निकम यांनी लोकसभा निवडणूक लढवली. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा १६,०००हून अधिक मतांनी पराभव केला. ॲड. निकम यांची पालांडेच्या खटल्यात पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

भाजप सरकारने निकम यांची नियुक्ती कुहेतूने केली असून त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा प्रचार निकम करतील. आता लोकांच्या नजरेत निकम यांचा हेतू, अजेंडा पूर्णपणे बदलला आहे. ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील.

भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय-प्रोफाइल प्रकरणांतील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील आणि ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल, असे पालांडेने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी पालांडेने मुंबई हायकोर्टाकडे केली आहे.

Ujjwal Nikam
Akhilesh Yadav:अखिलेश यादव यांचे राष्ट्रीय राजकारणातील 'वजन' वाढलं; आता लक्ष्य विधानसभा

भाजपकडून (BJP) लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी २५ प्रकरणांचा राजीनामा दिला होता. निवडणूक लढवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी २५ प्रकरणांमध्ये एसपीपी पदाचा राजीनामा दिला होता.

पण या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने उज्ज्वल निकम यांनी निवडणुकीपूर्वी हाताळलेल्या सर्व खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. ही अधिसूचना १० जूनपासून लागू करण्यात आली आहे.

दिल्ली व्यावसायिक अरुण टिक्कू आणि फिल्म प्रोड्यूसर करणकुमार कक्कड यांची हत्या केल्याचा आरोप विजय पालांडेवर आहे. पालांडे हा अनेक हत्या प्रकरणातील आरोपी आहे. २०१२ पासून पालांडे न्यायालयीन कोठडीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com