Akhilesh Yadav News : काँग्रेसला सोबत घेत उत्तरप्रदेशात भाजपला धुळ चारणारे समाजावादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचे राष्ट्रीय राजकारणातील 'वजन'वाढलं आहे. 18व्या लोकसभेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनात त्यांच्या देहबोलीवरुन हे स्पष्ट दिसत होते.
खासदार अवधेश प्रसाद यांचा हात हातात घेऊन संसद भवनाच्या पायऱ्या चढत होते. त्यांच्यामागे सपाचे खासदार होते. अखिलेश यादव यांचे राष्ट्रीय राजकारणातील वजन वाढत असल्याचे हे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. उत्तर प्रदेशात सपाने 80 पैकी 37 जागा जिंकल्या आहेत. उत्तरप्रदेशात सपा आणि काँग्रेसला एकूण 43 जागा मिळाल्या आहेत. भाजपला फक्त 33 जागा मिळाल्या आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा-काँग्रेसच्या आघाडीत दोघांना चांगलाच फटका बसला होता. सपाला पाचच जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला एकच जागेवर समाधान मानावे लागले होते.
यावेळी सपाने 37 जागा आणि काँग्रेसने 6 जागा पटकावल्या आहेत. सपाचा हा आतापर्यंतच सर्वात मोठा विजय आहे. या विजयाने अखिलेख यादव यांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्व वाढले आहे.
येत्या काही महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा, आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. यात महाराष्ट्रात काँग्रेस सपाला काही जागा देणार असल्याचे समजते. अखिलेश यादव सोमवारी राहुल गांधी यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसले होते. संसदेबाहेर आंदोलनात अखिलेश हे सोनिया गांधी यांच्यासोबत होते.
अवधेश प्रसाद हे फैजाबाद मतदारसंघातून निवडणूक आले आहे. या मतदारसंघात अयोध्या आहे. अवधेश प्रसाद यांचा विजय हा अखिलेश यांच्यासाठीचा मोठा विजय आहे. अन्य राज्यातील विधानसभेत आपल्या किती जागा मिळतील, याकडे सध्या अखिलेश यादव यांचे लक्ष आहे. कारण सपाला आता देशाला मोठा राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या तयारीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.