Pankaja Munde OBC subcommittee : पंकजा मुंडे OBC उपसमितीच्या बैठकीत आक्रमक; म्हणाल्या, 'मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्र...'

Pankaja Munde Opposes Bogus Certificates for Maratha : OBC उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक होत मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या प्रमाणापत्रावर ठोस भूमिका मांडली.
pankaja munde manoj jarange patil .jpg
pankaja munde manoj jarange patil .jpgsarkarnama
Published on
Updated on

Maratha community bogus certificates issue : राज्य सरकारने आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा उपसमिती नेमली होती, तशीच ओबीसींच्या आरक्षणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी OBC उपसमिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती केलेली आहे.

दरम्यान, या उपसमितीची मुंबईत बैठक झाली. यात छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक झाल्या. पंकजा मुंडे यांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेताना, 'ओबीसींवर अन्याय झाला नाही पाहिजे. मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्र दिले जाऊ नये, यासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे,' अशी मागणी केली.

मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणावर विरोध कायम ठेवला आहे. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. अध्यादेशामधील मराठा या शब्दावर त्यांनी नाराजी बोलून दाखवली. मराठा समाजासाठी काढलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाचा थेट फटका ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) बसत असल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.

या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत ओबीसींना मिळत असलेल्या योजनांचा लाभ, त्यासाठी उपलब्ध होत असलेला निधी, शिक्षणातील ओबीसींना मिळत असलेल्या आर्थिक लाभ यावर चर्चा झाली. ओबीसींमध्ये अनेक जातींचा समावेश आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्यायाची भावना बळावल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याया होणार नाही, यावर चर्चा झाल्याची माहिती पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली.

pankaja munde manoj jarange patil .jpg
Vice President Election Result : क्रॉस व्होटिंगवर राहुल गांधींचा थेट वार; फक्त 4 शब्दांत दिलं रोखठोक उत्तर...

अवैध नोंदी दिल्या जाऊ नये, यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी. तर, मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये, यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. हैदराबाद गॅजेटियरचा विषय आल्यावर बंजारा समाज देखील आरक्षण मागतोय, अशात संवैधानिक चौकटीत सर्व निर्णय घेतले जावेत. मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली आहे, ओबीसींवर अन्याय होणार नाही असं ते म्हणाले, अशीही माहिती पंकजा यांनी दिली.

pankaja munde manoj jarange patil .jpg
Ladki Bahin Yojana : ऑगस्ट-सप्टेंबर हप्ता थांबला! आता लाडकीच्या खात्यात एकाचवेळी 3,000 येणार? काय आहे कारण?

ओबीसींना मिळणाऱ्या निधी संदर्भात अन्याय झाला नाही पाहिजे. राज्यात गेली अनेक दशकं मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, आणखी लोकं ओबीसीत घेण्याचं स्वागत होत नाही. मात्र, कुणबी नोंदणीसंदर्भात आमचं कोणतंही म्हणणं नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना, पंकजा मुंडे म्हणाल्या, "छगन भुजबळ यांच्या अनुभवाचे बोल आहेत.त्याला नाराजी म्हणता येणार नाही." पांरपारिक कुणबी प्रमाणपत्रांना विरोध नाही. मात्र यातून बोगस दाखल गेल्यास ओबीसींवर अन्याय होईल, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com