Rohit Arya Encounter : 'ऑडिशन'च्या नावाखाली मुलांच्या जीवाशी खेळला; मुंबई पोलिसांकडून आरोपी रोहित आर्यचा 'एन्काऊंटर'

Powai Police Action : मुंबईतील पवईत एका व्यक्तीनं ऑडिशनच्या नावाखाली अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची खळबळजनक घटना घडली. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आलं होतं. याचवेळी 2 पालकही खोलीत बंद होते.
Rohit Aarya encounter .jpg
Rohit Aarya encounter .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबईतील पवईत एका व्यक्तीनं ऑडिशनच्या नावाखाली अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची खळबळजनक घटना घडली. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आलं होतं. याचवेळी 2 पालकही खोलीत बंद होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका केली. पण आता याप्रकरणातील आरोपीचा पवई पोलिसांनी (Powai Police) एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

(Police) त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पवई ओलीस प्रकरणातील आरोपी रोहित आर्या याला कारवाईदरम्यान गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलांना वाचविताना त्याच्यावर फायरिंग केल्याचे समजते. आत्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहितने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर प्रत्युतर देताना पोलिसांची गोळी रोहितला लागल्याचे समजते.

Rohit Aarya encounter .jpg
BJP On Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, भाजप आमदारानं काढलं जुनं प्रकरण बाहेर; मंत्रिपदावर टांगती तलवार

गेल्या पाच दिवसांपासून या भागात मालिकेसाठी ऑडिशन चालू असल्याने ही मुले येथे येत आहेत. मात्र, आज सर्व मुलांना ओलीस ठेवून संबंधित आरोपी किडनॅपरने व्हिडिओद्वारे माहिती दिली. ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत किडनॅपरने शाळकरी मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाल्यानं पोलिसांचे धाबे दणाणले होते. या घटनेनं मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारी 2 वाजताच्या सुमारास जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर रोहित आर्य या व्यक्तीने मुलांना एका खोलीत कोंडून ओलीस ठेवले. मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीनं माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं होतं.

Rohit Aarya encounter .jpg
Powai Child kidnapping : 17 मुलांचे अपहरण, स्टुडिओ पेटविण्याची धमकी, पोलीस बाथरूममध्ये घुसले अन्..! हृदयाचा ठोका चुकविणारी थरारक घटना...

तसेच मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com