Mumbai BJP chief Amit Satam
Mumbai BJP chief Amit Satam speaking on the Marathi Hindi language row, stressing that Mumbai’s identity remains rooted in Marathi culture.Sarkarnama

Amit Satam : 'मुंबईची भाषा मराठीच, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक जण...'; मराठी-हिंदी वादावर मुंबई भाजप अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

BJP Mumbai Politics : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. याच मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू देखील अनेक वर्षांनी एकत्र आले. महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईत मराठी भाषा धोक्यात आली असून भाजपकडून मराठी भाषा संपवण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय.
Published on

Mumbai News, 16 Sep : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. याच मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू देखील अनेक वर्षांनी एकत्र आले. महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईत मराठी भाषा धोक्यात आली असून भाजपकडून मराठी भाषा संपवण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय.

शिवाय मराठी-हिंदी वाद करून भाजप राजकीय पोळी भाजत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. आता याच सर्व टीकेवर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी मोठं भाष्य केलं आहे. ते 'ब्लॅक अँड व्हाईट' या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी अमित साटम यांना मराठी-हिंदी वाद करून भाजप राजकीय पोळी भाजतंय का? असा प्रश्न विचारला असता. साटम म्हणाले, 'अजिबात नाही, मुंबईची भाषा मराठीच आहे.

Mumbai BJP chief Amit Satam
Anjali Damania : 'स्वयंघोषित समाजसेविकेने आपल्या पतीला...'; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती होताच अजितदादांच्या आमदाराची बोचरी टीका

मुंबईत राहणारा कुठलाही व्यक्ती जो देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आलेला असो आणि तो मुंबईत अनेक वर्षापासून राहत असो ते सगळे मराठीच आहेत असं आम्ही मानतो,' असं परखड मत साटम यांनी मांडलं.

शिवाय यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंना सुनावलं. ते म्हणाले, दर पाच वर्षांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी सहा ते आठ महिने असे मराठीचे मुद्दे पुढे केले केले जातात. परंतू आता असं आहे की त्यांच्या या षढयंत्रला कोणी बळी पडणार नाही.

Mumbai BJP chief Amit Satam
Uddhav Thackeray BMC scam : मुंबई महापालिकेत देशातील सर्वात मोठा तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार; अमित साटम यांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा!

कारण खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. बीबीडी जाळीतील मराठी माणसांना घरं फडणवीसांनी करून दिली आहेत. त्यामुळे मुंबईतील मराठी माणूस भाजपसोबत आहे आणि भाजप महायुतीलाच तो आशीर्वाद देईल, असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com