
Porsche Car Accident : दीड वर्षांपूर्वी पुणे पोर्श कार अपघाताने हादरले होते. त्यानंतर आता मुंबईतही मध्यरात्री पोर्श कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेसवेवरील जोगेश्वरी परिसरात हा अपघात घडला. पोर्श आणि बीएमडब्ल्यू कारची रेसिंग सुरु असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. यात पोर्श कारमधील तीन मित्र गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ३ मित्र महागड्या लक्झरी पोर्श कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू गाडीसोबत रेस लागली. यात पोर्शे कारने नियंत्रणाबाहेर गेली आणि डिव्हायडरवर आदळली. त्याचवेळी मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यूनेही पोर्श कारला धडक दिली. यात पोर्श कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी अद्यापही या घटनेवर अधिकृत माहिती दिलेली नाही.
पुण्यात कसा घडला होता अपघात?
19 मे 2024 मध्ये कल्याणीनगर भागात रात्री एका भरधाव पोर्शे गाडीने एक तरुण आणि एका तरुणीला धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. ही पोर्श कार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांचा 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा चालवित असल्याचे समोर आले होते. बार आणि पब मध्ये पार्टी करून मोठ्या प्रमाणात मद्यपान करून अल्पवयीन मुलगा ही कार चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी सांगितले होते.
या अपघातानंतर गाडी चालवणाऱ्या तरुणाला बाहेर काढून नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पण या मुलाला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. पोलिसांनी अटक केल्यानंतर लगेच मेडिकलसाठी नेण्याऐवजी सकाळी ८ वाजता मेडिकल नेले. त्यामुळे त्याने मद्यपान केलेले की नाही? हे सिद्ध होऊ शकले नाही. याशिवाय ससून रुग्णालयातही मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.